उरण : जासई उड्डाणपुलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने ती सुरू करण्यात आली आहे. मात्र नवी मुंबई आणि पनवेलकडून येणारी तसेच उरणकडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये जा करीत असतांना वाहनांना शंकर मंदीर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेलकडे जाणारी पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते नवी मुंबई व पनवेल या मार्गाने खाजगी व सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. त्याचप्रमाणे जासई नाक्यावर वाहतूक कोंडी ही दूर झाली आहे. मात्र जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे.
हेही वाचा : पनवेल : कळंबोली येथे मराठा आरक्षणासाठी बांधव एकवटले
त्याचप्रमाणे पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी उरण वरून नवी मुंबईकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुला खालून खुल्या करण्यात आलेल्या मार्गिकेला छेदून जात असल्याने पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : अतिक्रमण पथकाविरोधात ऐन दिवाळीत बाजार बंद; फेरीवाले मोकाट, कारवाई मात्र व्यावसायिकांवर
दहा किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर कमी झाले : जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी करळ उड्डाणपूल ते धुतुम मार्गे गव्हाण फाटा या मार्गाने प्रवास करावा लागत होता. हे जवळपास दहा किलोमीटरचे अंतर कमी झाले असून करळ जासई मार्गे नंतर थेट गव्हाण फाटा काही मिनिटात कापता येत आहे.