उरण : जेएनपीए प्राधिकरणाच्या बंदरावर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (जनेपप्रा सेझ) मधील भूखंडाच्या लिलावांना उत्तम प्रतिसाद मिळत असून १०४ एकर जमिनीचा लिलाव झाला आहे. यामध्ये ३ कोटी प्रति एकरचा खर्च करून उद्योग उभारणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. विशेष आर्थिक क्षेत्रातील भाडेपट्ट्यावरील १६३ हेक्टर जमिनींपैकी ६२ हेक्टर जमीन आधीच ३१ युनिट्सना देण्यात आली आहे. ११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.

विशेष म्हणजे, राखीव किंमतीपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण १५ टक्के वाढ झाली आहे, ज्यामध्ये काही भूखंडांनी राखीव किंमतीपेक्षा ४० टक्के पेक्षा जास्त बोली केली आहे. जेएनपीए सेझ हे भारतातील अग्रगण्य बंदर-आधारित ऑपरेशनल मल्टी-प्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन, औद्योगिक विकासात लक्षणीय प्रगती करत आहे. २७७.३८ हेक्‍टर जागेवर विस्तारलेले, जनेपप्रा सेझ, धोरणात्मकदृष्ट्या जल, रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गांना सोयीस्कर प्रवासासाठी जोडले गेले आहे. आत्तापर्यंत, ३१ युनिट्सना सेझ भूखंड वाटप करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ९ युनिट्स आणि एक फ्री ट्रेड वेअरहाउसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) आधीच कार्यरत आहे. हे ऑपरेशनल युनिट्स वेअरहाउसिंग, फूड प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत.

हेही वाचा : उरणच्या पाणथळीवर पक्षी, खाद्याच्या शोधात पक्ष्यांची भ्रमंती वाढली

जनेपप्रा सेझने अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण केला आहे, ५६५ रुपये कोटींची गुंतवणूक करून वाटप केलेल्या युनिट्ससाठी कार्य सुरू करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि इतर उपयोगितांसाठी प्लग-अँड-प्ले तयार सुविधा प्रदान केल्या आहेत. विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) आणि विजेसाठी विद्युत वितरण परवानाधारक म्हणून, जनेपप्रा सेझ एक खिडकी मंजुरीची खात्री देते, गुंतवणूकदारांसाठी मंजुरी देण्यात येत आहे. जेएनपीए सेझ हे केवळ व्यवसायाचे केंद्र नसून ते आर्थिक प्रगतीसाठी उत्प्रेरक आहे. त्याचप्रमाणे अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रदान करून आणि विकासाला चालना देऊन व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, आमच्या गुंतवणूकदारांच्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रदेशाच्या फायद्यासाठी या सेझची पूर्ण क्षमता कार्यान्वित करण्याचे आमचे ध्येय असल्याचे मत जेएनपीएचे अध्यक्ष संजय शेठी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : कोकण भवन मधील कामकाज ठप्प: जुनी पेन्शन योजना मागणीसाठी कर्मचारी संपावर, अधिकारी सामूहिक रजेवर

सेझ मधील जमिनी ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी पारदर्शक ई-निविदा कम ई-लिलाव प्रक्रिया गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. कॉन्क्लेव्ह, गुंतवणूकदार समिट बैठका यामुळे जास्तीत जास्त सहभाग वाढला आहे, ज्यामुळे व्यवसाय करण्याच्या सुलभतेला चालना मिळणार आहे. भाडेपट्ट्यावरील १६३ हेक्टर जमिनींपैकी ६२ हेक्टर जमीन आधीच ३१ युनिट्सना देण्यात आली आहे. ११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली. विशेष म्हणजे, राखीव किंमतीपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण १५ टक्के वाढ झाली आहे, ज्यामध्ये काही भूखंडांनी राखीव किंमतीपेक्षा ४० टक्के पेक्षा जास्त बोली प्राप्त केली आहे.

Story img Loader