उरण : जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनासाठी महत्वपूर्ण असलेल्या उरणमधील कांदळवन विभागाच्या अखत्यारीतील दोन हजार हेक्टर कांदळवन क्षेत्राची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. अनेक ठिकाणी कांदळवनाच्या जंगलावर मातीचा भराव टाकून, त्याला आगी लावून किंवा या वृक्षांवर कचरा टाकून ती नष्ट केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण परिसरात हजारो हेक्टर भूखंडावर कांदळवन आहे. या कांदळवनाच्या सुरक्षेची जबाबदारी सुरुवातीला वन विभागाकडे होती. त्यात बदल करून सध्या ही जबाबदारी शासनाने स्वतंत्र निर्माण केलेल्या कांदळवन कक्षाकडे सोपवली आहे. यात प्रथम वन विभाग आणि आता कांदळवन कक्ष यांच्या दुर्लक्षामुळे येथील कांदळवनाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. उरण तालुक्यातील अनेक भागात रस्ते,बांधकाम,गोदाम तसेच इतर उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी कांदळवन नष्ट केले जात आहे. यात खाडीवरील बेकायदेशीर स्लूस गेट बंद केल्याने पाणथळ कोरडी पाडून कांदळवन नष्ट केली जात आहे. या संदर्भात पर्यावरणवाद्यांनी तक्रार केली आहे.

उरण आणि वाशीमध्ये मोठ्या ओल्या जमिनी आणि खारफुटीचे पट्टे गाडले जात आहेत.त्यानंतरच्या अधिकृत तपासणीनंतर नुकसानीची पुष्टी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खेद व्यक्त केला आहे. आशा प्रकारच्या घटना चिंताजनक आहे कारण आंतरराष्ट्रीय जैवविविधता निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १७६ व्या क्रमांकावर आहे आणि ही वेळ आली आहे. येथील जैवविविधता पुन्हा निर्माण करायला हवी असे मत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन.कुमार यांनी व्यक्त केले आहे. उरण तालुक्यातील अनेक ठिकाणी कांदळवन(खारफुटीची)तोडही केली जात आहे. यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे.

सुरक्षेसाठी कवेळ तीन कर्मचारी

उरण- पनवेल परिसरातील २ हजार ३०० हेक्टर जमीनीवरील कांदळवन क्षेत्र वन विभागाने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहे. मात्र या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी केवळ तीन कर्मचारी काम करीत आहेत. अशी माहिती कांदळवन विभागाने दिली आहे.

कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी कर्मचारी आहेत. यात वाढ करण्यात येणार आहे. तसेच कांदळवन नष्ट करणाऱ्याच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

समीर शिंदे, कांदळवन कक्ष अधिकारी