उरण : आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या उरण रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या वाहनतळ परिसरात बेशिस्त पद्धतीने दुचाकी उभी करण्यात येतात. या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. उरणकरांची रेल्वे लोकलची प्रतीक्षा संपून १२ जानेवारीपासून ही सेवा सुरू झाली. यामुळे हजारो उरणकर हे या लोकलने प्रवास करीत आहेत. या रेल्वेसेवेचा सर्वाधिक फायदा हा नवी मुंबईत शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना झाला आहे.

यामुळे यापूर्वी खासगी वाहने आणि एनएमएमटी, एसटी बसने प्रवास करीत होते. आता उरण शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी बहुतांश प्रवासी हे दुचाकीने प्रवास करीत आहेत. यामधील बहुसंख्य प्रवासी हे आपल्या दुचाकी रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्तपणे उभ्या करतात. यामुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो, उज्ज्वला तांडेल या महिला प्रवाशाने सांगितले.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

हेही वाचा : कळंबोलीतील तरुणी हत्या प्रकरणाच्या तपासास विलंब का?

स्थानक परिसर हा रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत आहे. मात्र, त्याचा परिणाम स्थानकाबाहेरील वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करू शकत नाही. मात्र, नियंत्रण करण्यासाठी वाहतूक स्वयंसेवक नेमण्यात येणार असल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.

Story img Loader