उरण : सकाळी ७ वाजता उरण सारख्या छोट्या शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी व चाकरमानी यांना बसत असल्याने शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई होणार का? असा सवाल केला जात आहे. पाऊस, उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यातच उरण शहरातील वाहतूक कोंडीतही दिवसभराची भर पडली आहे. भर उन्हात होऊ लागलेल्या कोंडीमुळे नागरीक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई कधी होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.

उरण शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. नगरपरिषदेने शहरात सम, विषम तारखांचे व नो पार्किंगचे फलक बसविले आहेत. मात्र अशा फलकांनंतर वाहनांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही उरण नगरपरिषदेने अशा प्रकारचे फलक बसविले होते. मात्र त्याची अनेक वर्षे अंमलबजावणी न झाल्याने कोंडीत भर पडली आहे. तर बहुतांशी ठिकाणी नो पार्किंगच्या फलका शेजारीच मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करून ठेवली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या होणार की कारवाई होणार या संदर्भात उरणकरांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

हेही वाचा : नवी मुंबई महापालिकेची अद्ययावत संगणकीय प्रणाली ९ महिन्यात!

उरण शहर व परिसरातील लोकवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे उरण शहरातील रस्ते वाहनांच्या तुलनेत अपुरे पडू लागले आहेत. मात्र त्यातही चारचाकी व दुचाकी वाहन चालकांच्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे शहरातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उरण मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस व उरण नगरपरिषद यांच्यात समन्वय होणे आवश्यक आहे. तरच ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यात यश येईल.

वाहतूक विभागाजवळ मनुष्यबळ नसल्याने ही समस्या वाढू लागली आहे. मात्र पोलीस आणि नगरपरिषद यांनी संयुक्तिक कारवाई सुरू केल्यास समस्या दूर होऊ शकते असे मत उरण मधील सामाजिक कार्यकर्ते महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. तर उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उरण नगरपरिषदेने जनजागृती म्हणून एक शॉर्ट फिल्म प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे नागरिक स्वयंम शिस्त पाळतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या फिल्मबद्दल शहरातील नागरीकांकडून अनेक मते व्यक्त केली जात आहेत.

हेही वाचा : पनवेल पालिका क्षेत्रातील गणेशोत्सवातील मंडपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

नगरपरिषद आपली जबाबदारी नागरीकांवर थोपवित असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण नगरपरिषदेने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यंत्रणा राबवावी, कोंडीला कारणीभूत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि त्यानंतर नागरीकांचे सहकार्य मागावे असेही अनेक नागरिकांचे मत आहे.

Story img Loader