उरण : सिडकोने उरण तालुक्यात बोकडवीरा ते नवीन शेवा व फुंडे विद्यालय ते नवघर असे तीन रेल्वे उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र या तिन्ही पुलांवर सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. तर नवघर पुलावर रात्रंदिवस पथदिवे सुरू आहेत. यातील उरण पनवेल मार्गाशी नवघर व उरण पूर्व विभाग तसेच द्रोणागिरी नोडचा औद्योगिक परिसर जोडण्यासाठी नवघर पूल आहे. या पुलावर अनेक वर्ष खड्डे आहेत. सध्या उरण पनवेल मार्गावरील द्रोणागिरीच्या सिडको कार्यालयाजवळील खाडी पूल नादुरुस्त आहे. उरणमध्ये ये-जा करणारी जड आणि एसटी व एनएमएमटी बसची सार्वजनिक वाहतूक याच पुलावरून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : जालना येथील घटनेचे पडसाद कायम, वाशीत आघाडीने केली निदर्शने

हेही वाचा : खारघरमध्ये एनएमएमटी बसला आग, सुदैवाने जिवितहानी नाही, प्रवासी सुखरूप

त्यामुळे हा पूल सर्वात जास्त रहदारीचा बनला आहे. या पुलावर विजेची सोय आहे. मात्र त्यातील काही दिवेच सुरू आहेत. तर फुंडे महाविद्यालय आणि जेएनपीटी कामगार वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. दुसरीकडे नवीन शेवा ते बोकडवीरा या रेल्वे उड्डाणपूलावरील वीज आठवड्यातून चार दिवस बंदच असते तशीच काहीशी परिस्थिती वायु विद्युत प्रकल्पाला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर आहे. या तिन्ही पुलाची उभारणी ही उरणमधील प्रवाशांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी केली असताना प्रवाशांना अंधारातून आणि खड्डेयुक्त पुलावरून प्रवास करावा लागत आहे. या उड्डाणपुलावरील वीज व्यवस्था कायमस्वरूपी करून खड्डे भरण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.