उरण : बुधवारी उरणमध्ये झालेल्या अतिवृष्टीतचा फटका उरणला बसला. यामध्ये तीन घरांचे नुकसान झाले असून एक घर पूर्णतः कोसळले आहे. तर तालुक्यातील एकूण ६५ पैकी २६ गावांमधील घरात पाणी शिरले होते. आता पूराचे पाणी ओसरले असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
हेही वाचा… नवी मुंबई अग्निशमन अधिकाऱ्याचा इर्शाळवाडीत बचावकार्य करताना मृत्यू
हेही वाचा… चर्चा सुरू शरद पवार नावाची
या पुरामुळे उरण तालुक्यात एकुण ८०५ कुटुंब बाधित झाली, यामध्ये २ हजार ८३५ नागरीकांचा समावेश आहे. ९७ कुटुंबातील ३५३ जण त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे स्थलांतरीत झाले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वशेणी, पुनाडे – केलवणे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.