उरण : तालुक्यातील चिरनेर हे शेतीसाठी प्रसिद्ध गाव असून सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेत गावात कोकणातील जमिनीत ऊस उत्पादन करून त्याचा ताजा रस काढून विकला जात आहे. दीड एकरावर हा ऊस पिकवला जात आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कोकणात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात उसाच्या शेतीसाठी पोषक हवामान नसून देखील उसाची शेती यशस्वी करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उसाच्या शेतीने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाची लागवड करून पारंपरिक भातशेतीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्पन्न काढून दाखविले आहे. संदीप किसन गोंधळी आणि संग्राम किसन गोंधळी हा तरुण शेतकरी आपल्या शेतात उसाची शेती लाऊन चांगले उत्पन्न कमावीत आहेत. संदीप-संग्रामचे वडील किसन गोंधळी हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. ते उसाच्या रस विक्रीचा व्यवसाय करत होते. या व्यवसायासाठी ते पनवेल येथून ऊस विकत आणत होते. मात्र प्रवास आणि वाहतूक खर्चामुळे नेहमी शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या किसन गोंधळी यांनी त्यांच्या शेतात ऊस लागवडीचा प्रयोग केला आणि त्यात त्यांना यश आले. तेव्हापासून ते त्यांच्या दीड एकरच्या शेतामध्ये उस लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. किसन गोंधळी यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या संदीप आणि संग्राम या दोन मुलांनी त्यांची शेतीची जबाबदारी उचलून उसाची शेती करणे सुरू ठेवले आहे. आणि तेदेखील उसाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

हेही वाचा…स्फोटातील दगड लागल्याने महिलेला बारा टाके, बांधकामांच्या ठिकाणी स्फोटांचा प्रश्न गंभीर

कमी शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळत असल्याने भविष्यात आणखी क्षेत्र उस लागवडीखाली आणण्याचा त्यांचा मानस आहे. पनवेल येथे आम्ही शेतीबरोबर उसाच्या रसाचा जोड धंदा करत आहोत. वर्षातून आठ महिने आम्ही उसाचा चरख्याचा व्यवसाय करतो. दिवसाला सरासरी तीन ते चार हजार रुपयांचा व्यवसाय आम्ही करतो. त्यासाठी आम्हाला पनवेलवरून आठ-दहा रुपये किलोने ऊस आणावा लागतो. मात्र हा ऊस ताजा नसल्याने या उसाचा रस कमी मिळतो. मात्र आमच्या शेतात पिकविलेल्या उस हा ताजा असल्याने त्यामधून जास्त रस मिळतो. गोंधळी बंधू या उसाच्या शेतीतून एकराला २५ टन उसाचे उत्पादन काढतात. आणि याच उसाचा त्यांच्या स्वत:च्या रसवंतीगृहात रस काढून विकल्यामुळे त्यांना फक्त पाच ते सहा महिन्यांत एका हंगामाला साधारणपणे चार ते साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. यासाठी त्यांना मजुरी, मशागत, खते, आणि बियाण्यासाठी पन्नास ते साठ हजारांचाच हंगामात खर्च येतो.

प्रगतिशील शेतकरी म्हणून संदीप आणि संग्राम गोंधळी यांची रायगड जिल्ह्यात ओळख तयार झाली आहे. ऊसाच्या शेतीबरोबरच ते स्वत: चरखा चालवून ताज्या उसाच्या रसाची विक्री पनवेल येथे येऊन करतात.

हेही वाचा…“बील न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे”, असा फोन आला तर विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते 

तीन वर्षे टिकणारी शेती

उसाची शेती तीन वर्षे टिकत असल्याने तेवढा लागवडीचा खर्च वाचतो. गोंधळी यांच्या मालकीच्या असलेल्या दीड एकर शेतीमध्ये आठ गुंठे जागेवर त्यांनी तळे खोदले आहे. त्या तळ्यातील पाणी हे या उसाच्या शेतीसाठी वापरतात. या शेततळ्यातून त्यांना वर्षभर पाणी तर पुरतेच शिवाय ५० हजारांपर्यंत मासळी पण मिळते. या तेवढ्याच शेतीत भाताचे उत्पादन वर्षाला फक्त २० हजारांच्या आसपासच निघाले असते. त्यासाठी उत्पादन खर्च पण जास्त येतो त्यामुळे उसाची शेती परवडणारी असल्याचे मत गोंधळी यांनी व्यक्त केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran taluka chirner village farmers did 25 tonnes sugarcane cultivation in unfavorable land and condition psg