उरण : खोपटे पुलावर जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी दोन्ही बाजूने अवजड कंटनेर वाहने उभी करण्यात आली आहेत. खोपटे परिसरात जाणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नसल्याने त्याचप्रमाणे ही वाहने वळणावर उभी करण्यात आली असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या मार्गाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या जुईनगर ते कोप्रोली या विद्युत बस ज्या लांबीने अधिक असतात यांच्यासह एसटी बस ही जात आहेत. त्यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खोपटे पूल मुंबई गोवा मार्गे अलिबाग पेणसह रायगड व कोकणात जाणाऱ्या वाहनांची ये-जा होते.
हेही वाचा : उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर
हेही वाचा : पनवेल रेल्वेस्थानकात रिक्षाचालकांची मुजोरी सूरुच
खोपटे खाडीवर सद्या दोन पूल आहेत. यातील एक पूल येण्यासाठी तर दुसरा जाण्यासाठी आहे. यातील खोपटेकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहने उभी आहेत. बहुतांशी वेळा एका बाजूला वाहने उभी करण्यात येतात. मात्र यावेळी पुलावर जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूने कंटनेर वाहने उभी आहेत. खोपटे पुलावर येथील गोदामात जाणारी वाहने अनेकदा उभी केली जात आहेत. त्यामुळे प्रवासी व नागरिकांच्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात बेकायदा उभ्या करण्यात येणाऱ्या कंटनेर वाहनांवर वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने यामध्ये वाढ झाली आहे.