उरण : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवर न्हावा शेवा वाहतूक पोलिसांनी आठवडाभरात ६५० बेशिस्त वाहनांवर कारवाई केली. यामध्ये ७ लाखांपेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी या सेतूवर वाहन संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी नियोजन केले आहे.

अटल सेतूपैकी १०.४ ते १९.६ किलोमीटरचा मार्ग न्हावा शेवा वाहतूक पोलीस हद्दीत येत आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी या ठाण्याकडे आहे. गव्हाण, शेलघर टोलनाका / शिवाजीनगर टोल यांचाही समावेश आहे. उद्घाटनानंतर सेतूवरच सेल्फी काढण्यासाठी वाहने थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई सुरू केली आहे.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

हेही वाचा : नवी मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प यंदा लवकर? लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या शक्यतेमुळे तयारी सुरू

सेतूवर चारचाकी वाहनांसाठी वेग-मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली आहे. तसेच या पुलावर विनाकारण थांबण्यास आणि वाहन उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वाहने सेतूवर उभी करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढतात. या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले.

हेही वाचा : नवी मुंबई : भाजपच्या माजी नगरसेवकाची पदाधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी, घटना सीसीटीव्हीत कैद

१५०० रुपयांपर्यंत दंड

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी दोन पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत. या पथकातील पोलिसांवर मनुष्यबळ कमी असल्याने ताण पडत आहे. त्यासाठी १०० वॉर्डनची, वाहतूक पोलिसांसाठी निवारा शेड तसेच गस्तीसाठी दोन वाहनांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Story img Loader