उरण : येथील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित युईएस शाळा व्यवस्थापनाने ओळखपत्र, डायरी, ई-लर्निंगची अतिरिक्त फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याचे निकाल देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या पालक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभर बुधवारी महाराष्ट्र दिनाची धामधूम असतानाच उरणमध्ये मात्र पालक- विद्यार्थ्यांना न्यायासाठी पोलिसांत धाव घ्यावी लागल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. उरण एज्युकेशन सोसायटीची विद्यार्थ्यांकडून ओळखपत्राच्या नावाखाली ५५०, डायरी-१००, ई-लर्निंग-१२०० अशी अतिरिक्त शुल्काची रक्कम शाळा व्यवस्थापनाकडून वसूल करीत असल्याचा आक्षेप घेत पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी विरोध केला आहे.

हेही वाचा : उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम

या संदर्भात उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही २९ एप्रिल २०२४ रोजी ओळखपत्र, डायरी आदी अतिरिक्त फी वसुलीसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांचे निकाल रोखता येणार नाहीत असे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात कॅपिटेशन अॅक्ट तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनावर गुन्हा नोंद करण्यासाठी उरण पोलिस ठाण्यात जमा झाले होते.

हेही वाचा : नवी मुंबई: अवजड वाहने चोरी करून विकणाऱ्या टोळीस अटक, अटक आरोपींमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी

मात्र उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी शाळा व्यवस्थापन आणि पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यावेळी शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त फी वसुली न करता विद्यार्थ्यांना निकाल देण्याचे मान्य केले. तसे संदेश पालकांना व्हॉट्सअॅपवर कळविण्यासही संमती दिली. यानंतरच पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालक माघारी परतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran ues school not declared result for extra fee parents registered case at police station css