उरण : उरणमध्ये रविवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे उरणमधील प्रदूषणाच्या मात्रेत घट झाली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अचानकपणे गारव्यात वाढ होऊन विजा चमकू लागल्या. रविवारी पहाटे साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अर्धा ते पाऊण तास सुरू होता. मात्र पाऊस गेला म्हणून निवांत झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी माळणी करून भाताचा पेंढा ढीग करून ठेवला होता. हा पेंढा ओला झाला आहे. तर काही शेतातील भात पीक ही कापणी करण्याचे राहिले असून त्याचेही नुकसान या अवेळी पावसाने केले आहे.
हेही वाचा : विमानतळ नामकरणानिमीत्त ओबीसी एकत्रिकरणाचा प्रयत्न ? दि.बा. पाटील यांच्या नावाचा लढा आणखी तीव्र
तर दुसरीकडे उरणच्या दररोजच्या २०० ते अडीचशे अंकावरी प्रदूषणाचा निर्देशांक १४० वर येऊन कमी झाला आहे. उरण तालुक्यात झालेल्या अवेळी पावसाच्या सरीमुळे हवेतील धूकणाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे उरणच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावला. त्यामुळे ही उरणच्या नागरिकांना दिलासा मिळाला. सरी बरोबर वातावरणातील धूलिकण पावसा बरोबर खाली आल्याने अनेक ठिकाणी धुळीचा धर साचलेला दिसत होता.