नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. मात्र कोबीची मागणी वाढली असल्याने दर चढेच आहेत. बाजारात भाज्यांची आवक वाढली असून विशेषत: टोमॅटो, शिमला मिरची हिरवी मिरची, फ्लॉवर या भाज्यांचे दर गडगडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परतीच्या पावसामुळे भाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. पंरतु बाजारात आता भाज्यांची आवक वाढत असून सोमवारी बाजारात ६२८ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो, शिमला मिरची हिरवी मिरची ,फ्लावरच्या दरात प्रतिकिलो १०-२० रुपयांनी घसरण झाली आहे. तर कोबीचे दर मात्र चढेच आहेत. एरव्ही कोबी प्रतिकिलो ८-१०रुपयांनी उपलब्ध असते मात्र परराज्यात कोबीची मागणी वाढल्याने दर वधारले आहेत.

हेही वाचा…नवी मुंबईत भाजपला उपरती, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात संदीप नाईकांची पक्षातून हकालपट्टी, भाजपची धावाधाव

u

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने भाजीपाल्याची दरवाढ झाली होती. मात्र आता दर आवाक्यात येत आहे. मात्र कोबीला परराज्यात मागणी वाढल्याने कोबीचे दर चढेच आहेत. – बाळासाहेब बडदे, घाऊक व्यापारी, एपीएमसी

आता

टोमॅटो

५०

आधी

४०-४५

शिमला

मिरची

२०-२४

फ्लॉवर

२५-३५

हिरवी मिरची

२०-३०

कोबी

८-१०

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vashis apmc market vegetable prices dropped due to increased arrivals sud 02