नवी मुंबई : नवी मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या स्थानकाचे उद्घाटन ६ एप्रिल नंतर होणार असल्याचं आश्वासन दिले आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दानवे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी केली. त्यावर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. नाईक यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत ३ मार्च २०२३ रोजी बैठक झाली होती.
हेही वाचा >>> बोकडवीरा ते शेवा उड्डाणपूल अंधारात सिडकोच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष
या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय झाला. संजीव नाईक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे नुकतीच १६ मार्चला भेट घेतली. दिघा स्थानकातील जवळजवळ सर्व अपूर्ण कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी केली. दानवे यांनी यासंदर्भात लगेचच वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून ते ६ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे हे अधिवेशन संपतात दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आहे.