नवी मुंबई – नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून, नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या शहरातील अबाल वृद्धांचे महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे  केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची, तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाकाळापासून जवळजवळ अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद आहे. त्यामुळे हे पार्क कधी सुरू होणार याची उत्सुकता शाळांना सुट्टी लागलेल्या बच्चेकंपनीसह पालकांना आहे. १ मे महाराष्ट्र दिनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळाली नसून शहर अभियंता यांनी ३ मे पर्यंत संबंधित सर्व विभागांना आपापल्या विभागाची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ३ मे चा तरी मुहूर्त नक्की होणार का? अशी अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : पालिका उद्यानातील हत्ती खाली कोसळला? पालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष?

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच वर्षांपासून बंदच असलेले हे पार्क महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा गजबजणार का, याची चर्चा सुरू झाली होती . पालिकेने हे पार्क सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे वेळ मागितला होता. अनेक दिवसांपासून वंडर्स पार्कला आवश्यक असणाऱ्या सबस्टेशनचे विद्युत विभागाचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली होती. आता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकल्यामुळे पार्क कधी गजबजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेरुळ येथील वंडर्स पार्कचे मेकओव्हर करण्यात आले आहे. वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अॅम्पिथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव, खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. आता त्यात नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन लेझर शोसहित, नवीन ऑडिओ व्हिज्युअल यंत्रणा बसविणे, तलावांची दुरुस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रिक मशीन लावणे, नवीन विद्द्युत दिवे लावणे. उद्यानात आकर्षक कारंजे, अशा जवळजवळ २३ कोटींपेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मानखुर्द-नवी मुंबई विमानतळदरम्यान सिडकोचा मेट्रो प्रकल्प; सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद

नेरुळमधील वंडर्स पार्कला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे, खारघर, उरण, पनवेल येथून टॉय ट्रेन, तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरिक येतात. आता पार्कमधील खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यातच मुलांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे नव्याने सुरू होणाऱ्या वंडर्स पार्कची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

बच्चेकंपनीसाठी आकर्षण असलेले हे पार्क सुरू करण्यासाठी पालकांची मागणी वाढू लागली आहे. तसेच हे पार्क नव्याने नागरिकांना खुले करण्यासाठी पालिकेच्याही वेगवान हालचाली सुरू आहे. विद्युत विभागाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी लोकसत्ताला दिली आहे. आगामी काळात मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरप्रमाणे नवी मुंबईतील विज्ञान केंद्रही नावारुपाला येईल, असे काम याच पार्क शेजारी वेगाने सुरू आहे.

वंडर्स पार्क लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सातत्याने प्रशासन प्रयत्न करत आहे. सर्व प्रकारची कामे ३ तारखेच्या आत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, असे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of wonders park in nerul likely to be held on 3 may zws
Show comments