उरण : गेल्या दोन वर्षांपासून हवा प्रदूषणात उरणची देशभरात अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा येथील नागरिकांच्या शरीरावर हानीकारक परिणाम होऊ लागला आहे. मात्र इतक्या गंभीर समस्येची निवडणुकीतील एकाही पक्ष आणि उमेदवारांनी दखल घेतलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून उरण हे देशातील हवेतील धूलिकणांच्या कक्षेतील शहरांत पहिल्या क्रमांकावर आले आहे. गेल्या आठवड्यात उरणच्या हवेचा निर्देशांक (एक्यूआय) ३०० पार पोहोचला होता. ही आकडेवारी हवेतील प्रदूषणाची उच्च पातळी आहे. त्यामुळे हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर जागतिक आरोग्य संस्थेने दक्षता घेत येथील नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची सूचना केली आहे. प्रदूषणात मार्च २०२२ मध्ये हा क्रमांक दुसरा होता. यात वाढ झाली आहे. त्यामुळे उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
mumbais air index moderate with bad air recorded in Shivdi Worli and bkc
शिवडी, वरळी बीकेसीत अशुद्ध हवा, मुंबईची हवा गुणवत्ता खालावली

हेही वाचा – ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

१० फेब्रुवारी २०२२ रोजी उरण येथील प्रदूषणाची नोंद ही जागतिक स्तरावर ७ व्या क्रमांकावर आणि देशात ४ थ्या स्थानावर करण्यात आली होती. पर्यावरणवाद्यांनी त्या वेळी चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या संदर्भात नॅटकनेक्ट फाऊंडेशनमार्फत करण्यात आलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पर्यावरण आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाला याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

हवेची गुणवत्ता पात्रता : हवेतील प्रदूषणाची मात्रा ही ० ते ५० चांगली, ५० ते १०० मध्यम, १०० ते १५० आजारी व श्वसन विकारासाठी हानीकारक, तर १५० ते २०० ची मात्रा ही आरोग्यास प्रचंड हानीकारक मानली जाते. या मात्रेनुसार उरणच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा ही माणसासाठी प्रचंड हानीकारक बनली आहे. या हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मुखपट्टी (मास्क) लावण्याची सूचना करण्यात आली आहे.

हवा प्रदूषणाची कारणे

– उरणमधील हवेतील वाढत्या प्रदूषणाची प्रमुख कारणे ही या परिसरातील दगडखाणी, मातीसाठी येथील डोंगरांची सुरू असलेली पोखरण, जेएनपीटी बंदर व त्यावर आधारित उद्योगात ये-जा करणारी हजारो वाहने, हवेत पसरणारे वायू, रस्त्यातील खड्ड्यांमुळे निर्माण होणारी धूळ, उरणला कचराभूमी नसल्याने जाळला जाणारा कचरा यामुळे उरणच्या हवेतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हेही वाचा – ठाकूरांच्या कामगिरीवरून वाद;पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचे मुद्दे ऐरणीवर

– प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा ज्येष्ठ व आजारी नागरिकांना बसत आहे. त्यामुळे शासनाने यावर लक्ष देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व येथील प्रकल्पाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन दिले असल्याची माहिती उरणमधील सामाजिक पर्यावरण कार्यकर्ते जयवंत ठाकूर यांनी दिली आहे.

– प्रदूषण नियंत्रण मंडळाने वातावरणातील हवेच्या गुणवत्ता निरीक्षणाची जबाबदारी घेऊन प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. त्याचप्रमाणे याचे अधिकार हे स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना असल्याचे मत पर्यावरणवादी कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले आहे.