उरण : उरण-पनवेल राज्य महामार्गावरील फुंडे स्थानका जवळील खाडी पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर हाईट गेट बसविले आहे. गेटच्या उंचीचा अंदाज न आल्याने आता पर्यंत नऊ पेक्षा अधिक टेम्पोना व इतर वाहनांना अपघात झाले आहेत. या उंचीवर मर्यादा असल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनांना धोका वाढला आहे. एप्रिल २०२१ मध्ये जेएनपीटी ते फुंडे मार्गावरील खाडी पूल कोसळला होता.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Encroachment again on IT Park to Mate Chowk road
आयटी पार्क ते माटे चौक मार्गावर पुन्हा अतिक्रमण

या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्या नंतर येथील ग्रामस्थांनी उरण पनवेल मार्गावरील इतर पुलाची तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार केलेल्या तपासणीत उरण पनवेल मार्गावरील फुंडे स्थानका जवळील पूलही नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल जड वाहनांसाठी बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावरील एस टी व एन एम एम टी या सर्वजनिक वाहतुकीच्या सेवाही बंद आहेत. या फटका फुंडे,बोकडविरा,डोंगरी व पाणजे या चार गावातील नागरिकांना बसला आहे. त्यातच या मार्गावरून जड व उंचीची वाहन प्रवेश करू नये म्हणून हाईट गेट बसविण्यात आले आहेत. या हाईट गेट चा अंदाज न आल्याने तसेच अनेक वाहनांची बेकायदा वाढविण्यात आलेली उंची यामुळे अपघात होत आहेत.

हेही वाचा : ‘श्रीमंत’ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न, चोरांच्या हाती लागले धुपाटणे

सिडकोच्या अग्निशमन वाहनांना फटका

उरण पनवेल मार्गावर बसविण्या आलेल्या हाईट गेटचा फटका फुंडे स्थानका जवळच असलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलाच्या वाहनांही बसत आहे. त्यामुळे उरण शहरात किंवा पनवेल कडे जाण्यासाठी या धोकादायक पुलावरूनच अग्नीशमन दलाच्या वजनी वाहनांना याच मार्गावरून ये जा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे हाईट गेटमुळे फुंडे गावाजवळून वळसा घालून जावे लागत असल्याने घटनेच्या ठिकाणी पोहचण्यास अधिकचा वेळ लागत आहे.या संदर्भात द्रोणागिरी अग्निशमन दलाकडून पर्यायी मार्गाची मागणी करण्यात आली आहे.