भाज्यांच्या, घसरत्या किंमतीनंतर गृहिणी आंनदात असल्या तरीही आता लसणीच्या वाढत्या दराने खिशाला कात्री बसत आहे. भाज्यांसह सगळ्याच पदार्थात लसूण वापरला जात असल्याने आता गृहिणींना लसणीच्या तडक्याबाबत हात आखडता घ्यावा लागणार आहे. स्वस्त असलेल्या लसणाच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली असून कमीत कमी ६० रु ते जास्तीत १००रु रुपयांवर विक्री होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नाल्यातील काळ्या पाण्यामुळे पिरवाडी किनारा काळवंडला

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

एपीएमसी बाजारात गुजरात आणि मध्यप्रदेशहून लसणीची आवक होत आहे. जुन्या लसणाचा शेवटचा हंगाम असल्याने लसणीची आवक कमी झाली आहे .तसेच उच्चतम प्रतिचा लसूण कमी आणि हलक्या प्रतिचा लसूण अधिक प्रमाणात येत आहे. उच्चतम प्रतीच्या लसणाला जास्त मागणी आहे. त्यामुळे लसणीच्या किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एपीएमसी बाजारात नेहमी लसणीच्या १५ ते २० गाडय़ांची आवक होते. मात्र सध्या ३ गाडय़ा दाखल होत असून ५४६ क्विंटल आवक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर आवाक्यात होते. परंतु एपीएमसी बाजारात आता कांदा-बटाटा पाठोपाठ लसणाचे दर ही वधारण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत स्वच्छतेबाबतची मरगळ संपता संपेना…; निर्माल्य कलश भरले; उचलणार कधी ?

सध्या बाजारात हलक्या प्रतिचा लसूण दाखल होत आहे. त्यामध्ये काळवंडलेला , नरम लसूण जास्त आहे. त्यामुळे चांगल्या मालाला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात सध्या हलका लसुण प्रतिकिलो १०-६०रु तर चांगला लसूण ६०-१००रुपयांवर उपलब्ध आहे. फेब्रुवारी मध्ये नवीन लसुण दाखल होण्यास सुरुवात होईल तोपर्यंत लसणाचे दर चढेच रहाण्याची शक्यता आहे.