नवी मुंबई: पावसाळा सुरु झाला की साथीचे आजार गॅस्ट्रो, अतिसार, लेप्टोस्पायरोसीस तसेच किटकजन्य आजार मलेरिया ,डेंग्यू आजार डोके वर काढू लागतात. नवी मुंबई शहरात एप्रिलपासून दूषित पाणीपुरवठ्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे यंदा गॅस्ट्रोच्या रुग्ण वाढत आहेत. जानेवारी ते आतापर्यंत एकुण १०१ रुग्ण आढळले असून जूनमध्ये २३ तर या महिन्यात आतापर्यंत ९ रुग्ण आढळले आहेत.
ज्या भागात दुषीत पाणी पुरवठा होतो. जुनी पाईप लाईन गंजलेल्या पाईप लाईन पाण्याची गळती यातून जंतू संसर्ग पाण्यात येतात. पाणी दुषीत येते, ते पोटात गेल्यास गॅस्ट्रोची लागण होते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. नवी मुंबई शहरात एप्रिलपासून आठवड्यातुन दोन ते तीन वेळा दूषित पाणी पुरवठा होत आहे. एक दिवस पाणी न आल्याने त्याच्या पुढील दोन दिवस हिरवे गढूळ पाणी येते. त्यामुळे वारंवार दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय त्यामुळे साथीचे आजार देखील बळावत आहेत.
हेही वाचा… नवी मुंबई: आरटीओची ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ धडक मोहीम सुरु; नशेबाज चालकांवर करडी नजर
दूषित पाण्याने यावेळी गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ झाली आहे. गॅस्ट्रोच्या, अतिसार, हगवण या आजारांमध्ये ताप येणे, अतिसार, उलट्या होणे, जल शुष्कतेची लक्षणे हात पाय गार पडणे, त्वचा शुष्क पडणे ही लक्षणे आढळतात. जून मध्ये गॅस्ट्रोचे २३ तर जुलैत आतापर्यंत ९ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे २८८ तर जुलैमध्ये २३ संशयित रुग्ण आढळले आहेत.