गेल्या काही वर्षांपासून राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबई शहराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे येथील विकासही झपाट्याने होत असून महा मुंबई उदयास येत आहे. असे असले तरी परंतु दुसरीकडे याच राहण्याजोगे प्राधान्य देणाऱ्या शहरात दिवसेंदिवस अतिखराब, अशुद्ध हवा नागरिकांना मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा २५० ते ३०० एक्युआय हून अधिक निदर्शनास येत आहे एकंदरीत या अतिखराब हवेमुळे एक प्रकारे नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याशी विशेषतः फुफ्फुसाशी खेळले जात आहे.
हेही वाचा- उरण : सततच्या आगींमुळे उरणमधील वनसंपदा व सजीव सृष्टीचे होतेय नुकसान
नवी मुंबई शहरात औद्योगिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित प्रदूषित हवा अशीच हेवेत सोडली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये हे प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी धुक्यांचा आसरा घेत या औद्योगिक कंपन्या सर्रासपणे हवेत रासायनिक मिश्रित प्रदूषके सोडत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू असल्याने ही त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुरळ्यामुळे ही हवेत धुलीकन मिश्रित होत आहेत , असा दावा केला जात आहे. परंतु असे असले तरीही महापालिकेकडून कोणतेही ठोस पावले उचलल्याचे निदर्शनास येत नाही. रविवारी दि. ५ रोजी शहरातील कोपरी, वाशी, उलवे या नोडमध्ये रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात धुरके पसरलेले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती . रविवारी नवी मुंबई शहराचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक २३८ एक्युआय होता, तर नेरुळ मध्ये ३४१ एक्युआय सर्वाधिक प्रदूषित होता. या पाठोपाठ कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २१६ एक्युआय होता. नवी मुंबईकरांची या अशुद्ध हवेतून सुटका कधी होणार ? असा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे.
हेही वाचा- बोंबला! त्याचं चोराने परत मारला कोपरखैरणे विभाग कार्यालयात डल्ला; पोलिसांचे भयही उरले नाही
अतिखराब हवा फुफ्फुसाला ठरतेय अपायकारक
कोविड काळात करोना विषाणूने नागरिकांच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे. त्यामुळे आधीच फुफुसांची प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे . त्यात शहरात थंडीमध्ये हवेत मोठ्या प्रमाणावर धुक्यांचे प्रमाण आढळत आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे . थंडीमध्ये हवेतील प्रदूषकांना उष्ण-दमट हवा मिळत नसल्याने त्यांचे हवेत विघटन होण्याचे तसेच विरून जाण्याची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे हे प्रदूषित घटक हवेत तसेच बराच वेळ राहतात आणि हीच हवा नागरिकांना मिळते. त्यामुळे हे हवेतील प्रदूषक घटक थेट फुफ्फुसांना अपायकारक ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास तसेच श्वसनाचे विकार जडतात ,असे मत महापालिका वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांनी व्यक्त केले आहे. सध्या शहरात सर्दी खोकल्याचे रुग्ण देखील वाढत आहेत
हेही वाचा- नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कल
गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस हवा प्रदूषण वाढत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला वारंवार तक्रारी करून येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती आहे. तक्रारी करताच त्यादरम्यान हवेतील प्रदूषण कमी होते. परंतु पुन्हा हवेतील धुके वाढलेले दिसतात . एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या रासायनिक मिश्रित हवेवर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषक घटक हा हवेत तसेच सोडून देत आहेत. परिणामी नागरिकांच्या आरोग्याशी चांगलाच खेळ मांडलेला आहे. याकडे महानगरपालिकेला लक्ष देण्यासाठी फुरसत नाहीये ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत वाशीतील रहिवासी सुरेश शेट्टी यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक २३९
हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) रविवार सोमवार
नेरुळ ३४१ ३२९
कोपरखैरणे २११ २१६