उरण: पावसाळ्यापूर्वी वीज पुरवठा करणाऱ्या विजेचे खांब, तारा यांची दुरुस्ती न केल्याने उरणच्या विविध परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील वीज उपकरणे नादुरुस्त होऊ लागली आहेत. याचा फटका नागरीकांना बसत आहे. उरण महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात विद्युत वाहक तारा तुटणे, खांब पडणे तसेच रोहित्र नादुरुस्त होणे, तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे रात्री अपरात्री सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. अशा प्रकारच्या घटना मागील वीस दिवसांपासून सुरू आहेत. तर उरण मध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने सततच्या बत्तीगुलच्या समस्येमुळे नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in incidents of electric wires breaking and poles falling in uran area dvr
Show comments