लोकसत्ता प्रतिनिधी

उरण: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या उरण मार्गावरील इलेक्ट्रिक बस नादुरुस्त होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता कोप्रोली ते जुईनगर दरम्यानची ३४ क्रमांकाची बस खोपटे येथे बंद पडल्याने नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला. आशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…

उरण ते नवी मुंबईतील मार्गावरील विद्यार्थी, महिला व चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्वाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टी च्या बस सातत्याने बंद पडू लागल्या आहेत. या बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईत जाणारी बस खोपटा येथे बंद पडली होती. ही इलेक्ट्रिक बस का बंद पडली हे चालकांना सांगता येत नसल्याचे उघड झाले आहे. तर यापूर्वी ही आशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये भर पावसात इलेक्ट्रिक व साध्या बसही बंद पडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

हेही वाचा… मोरबेच्या जलपूजनाची घाई; नाईकपुत्र अडचणीत, पालिकेच्या परवानगीविना पूजाविधी; घुसखोरीबद्दल प्रशासनाची तक्रार

नवी मुंबई महानगर पालिकेच्या एन एम एम टी सेवेच्या बसेस उरण पर्यंत येत आहेत. यातील अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पावसात या इलेक्ट्रिक बस बंद अचानक पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… प्रकल्पांच्या नावाने नष्ट केल्या जाणाऱ्या कांदळवनाची केंद्र सरकारकडून दखल

उरणच्या शहरी भागासह पूर्व विभागातील नागरीकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएनटी बस सेवा ही महत्वपूर्ण ठरत आहे. या सेवेमुळे येथील चाकरमानी, विद्यार्थी व व्यावसायिक यांना लाभ होऊ लागला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३४ क्रमांकाची बस जुईनगर रेल्वे स्थानक ते कोप्रोली किंवा वशेणी येथे ये जा करीत आहे. त्यामुळे उरण, पनवेल व पेण या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना फायदा होत आहे. या परिसरातील नागरीक जलद व वातानुकूलित बसने प्रवास करीत आहे. त्यामुळे ही बस सेवा रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची ठरू लागली आहे.

Story img Loader