सायबर सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनेतील वाढ चिंताजनक ठरत आहे. यात महिला अत्याचारात बाल लैंगिक अत्याचार घटनात सुद्धा वाढ झाली असून  यातही धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश प्रकरणात  हे अत्याचार करणारे अत्यंत जवळले नातेवाईक किवा परिचित व्यक्तीच आहेत. त्यामुळे आपली चिमुरडी घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी तिच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उमटत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई ट्रॅफिक पोलीस ऑन अँक्शन मोड; एकाच दिवसात १,४२७ विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

नवी मुंबईत २०२२ मध्ये घडलेल्या एकूण गुन्ह्यापैकी  महिला अत्याचाराचे गुन्हे १२ % आहेत. हि चिंतेची बाब असल्याचे पोलिसांनीच मत व्यक्त केले. मात्र यात महिला अत्याचारात बहुतांश वेळा घरातील व्यक्ती नातेवाईक परिचित व्यक्तीच आरोपी निघतो हे सुद्धा तेवढेच विदारक चित्र आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी घेतलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत हि धक्कादायक माहिती दिली. २०२२ मध्ये महिला अत्याचाराची ७६२ गुन्हे घडले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण विनयभंगाचे असून २५२ गुन्हे नोंद झाले जे ३३ टक्के एवढे आहे  त्या खालोखाल बलात्कार असून २३६ गुन्ह्यांची नोंद झाली असून महिला अत्याचाराच्या एकूण गुन्ह्यांपैकी हे प्रमाण ३१ % आहे त्या नंतर महिला छळवणूक गुन्हे असून या बाबत २२६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे जे एकूण गुन्ह्यांच्या ३० % आहे.

हेही वाचा- ‘मी मोठा शेठ’ म्हणत प्रवाशांची फसवणूक, बघता बघता दागिणे लुटायचे; लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना बेड्या

अपमानास्पद वागणूक ५ टक्के (३८), आहे. तसेच मानसिक दबावाने ११ महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. महिला अत्याचारात सर्वात गंभीर आणि ज्याने आयुष्य उध्वस्त होते असा   बलात्कार समाजाला जातो. २०२१ मध्ये १९८ बलात्कार झाले होते, त्यात१०५ बलात्कार हे अल्पवयीन मुलीवर झाले होते. तर २०२२ मध्ये एकूण २३६ बलात्कार गुन्ह्यांची नोंद झाली त्या पैकी १३१ हे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे आहेत. या बाबत अभ्यास केला असता बहुतांश प्रकरणात रक्ताचे नाते असलेली व्यक्ती , जवळचे नातेवाईक परिचित व्यक्ती असे आरोपी म्हणून नोंद झालेले आहेत. विशेष म्हणजे २०२२ मध्ये केवळ एक गुन्हे सिद्धी झाली असून हि गुन्हे सिद्धी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात असून आरोपीला जन्मठेप शिक्षा झालेली आहे.

Story img Loader