पनवेल : गेल्या तीन दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे पनवेल, खारघर व कळंबोली या तीनही वसाहतींमधून सूरु होणारी इंडियन स्वच्छता लीगची फेरी होणार की नाही याबद्दल साशंकता होती. मात्र पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी वेधशाळेतून हवामानाचा अंदाज घेत शनिवारची नियोजित फेरी तीनही वसाहतीमधून उद्या सकाळी साडेसात वाजता सूरु होणार असल्याचे जाहीर केले. केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजनात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम पालिकेने आयोजित केले असून ‘इंडियन स्वच्छता लीग’स्पर्धा ही त्यापैकी एक आहे.

हेही वाचा <<< मासिक वेतनासाठी माळी कामगारांचे भीक मांगो आंदोलन

शनिवारी (ता.१७) सकाळी साडेसात वाजता एकाच वेळी खारघर वसाहतीमध्ये सायकल फेरी, कळंबोली आणि पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीगच्या’ रॅलीमध्ये तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने ‘पनवेल चॅम्पियन्स’ हा संघ तयार केला असून पनवेलमधील प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या संघाची कर्णधार असणार आहे.

हेही वाचा <<< नवीन पनवेलचा जिवघेणा उड्डाणपुल

या मार्गिकांवरुन फेरी सकाळी साडेसात वाजता फेरी सूरु होणार

– खारघर    उत्सव चौक ते गुरूद्वारा सायकल फेरी व स्वच्छता

– कळंबोली   पोलिस निवारा केंद्र ते जनता मार्केट ते लेबरनाका पदयात्रा व स्वच्छता मोहीम

– पनवेल – पालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पदयात्रा व स्वच्छता मोहीम

Story img Loader