नवी मुंबईतील सीबीडी येथील राजीव गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’.मध्ये सुप्रसिध्द संगीतकार, गायक शंकर महादेवन हे ‘नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार म्हणून प्रतिनिधी त्व करीत होते. इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या कार्यक्रमात नवी मुंबई हे देशातील सर्वोत्तम शहर असल्याची प्रतिक्रिया देत स्वच्छतेत नवी मुंबईच पहिली येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड; चार जण ताब्यात
सीबीडी येथे ‘युथ वर्सेस गार्बेज’ आयोजित
कार्यक्रमात सकाळी ८.३०वाजल्या पासून शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. जवळ जवळ ४३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी नवी मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणारे गायक शंकर महादेवन यांनी सांगितले की, एक वर्षापासून शहर स्वच्छतेसाठी मी आपल्या नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करीत आहे. शहर स्वच्छ ठेवणे हे कोणा ऐका व्यक्तीची जबाबदारी नसून संपूर्ण शहरातील नागरिकांची जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या परीने आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, तर स्वच्छतेमध्ये सर्वोत्तम स्थान गाठण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. आजच्या कार्यक्रमात मुलांच्या माध्यमातून स्वच्छतेचे प्रबोधन , स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता, आणि मला विश्वास आहे की, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश नागरिकांनापर्यंत पोहोचणार आहे. देशात स्वच्छतेत नवी मुंबई पहिली येणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.