नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक शाखा शहरात अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंगवर कारवाई करीत असते, मात्र पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगकडे दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक या परिसरात महत्त्वाचे कार्यालये असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण असते ते रस्त्याच्या बाजूला बेशिस्तपणे लावलेल्या गाडय़ा. या वाहनांवर नियमित कारवाई केली जाते. मात्र पोलीस आयुक्तालयासमोर लावलेल्या गाडय़ा या पोलीस अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.

तत्कालीन आयुक्त जावेद अहमद यांनी पोलीस आणि पोलीस आयुक्तालयात  कामानिमित्त आलेल्यांना प्रवेशद्वाराबाहेर गाडय़ा लावण्याचे फर्मान काढले होते. तेव्हापासून नवीन येणाऱ्या आयुक्तांनीही त्यांचीच री ओढली. याच परिसरात न्यायालय, सिडको, रिझव्‍‌र्ह बँक कार्यालय, सीजीओ इमारत आणि एक पंचतारांकित हॉटेल आणि पोलीस आयुक्तालय अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवणे अपेक्षित असताना त्याचे पालन होत नाही.

या ठिकाणी असलेल्या सर्व कार्यालयात येणाऱ्यांच्या गाडय़ा त्या-त्या कार्यालयाच्या इमारतीत आवारात लावल्या जातात. अपवाद फक्त पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा. वास्तविक या आवारात मुबलक जागाही उपलब्ध असूनही सर्व गाडय़ा बाहेरच लावण्याचा दंडक घालण्यात आला आहे. मात्र त्यामुळे परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होत असते.

याच कार्यालयाच्या एका दिशेला ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला असला तरी येथे सर्रासपणे गाडय़ा उभ्या केल्या जातात.

पोलीस आयुक्तालयाबाहेर उभ्या करण्यात येणाऱ्या गाडय़ांबाबत माहिती घेऊ न योग्य ती कारवाई केली जाईल. कारवाई करताना दुजाभाव केला जात नाही.

      – सुनील लोखंडे, ठाणेकर