नवी मुंबई : वेदांत व फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रा येणार प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्याबाबत विरोधकांकडून आरोप केला जात आहे. परंतू ह्या प्रकल्पाबाबत सरकारसोबत कोणाताही सामंजस्य करार झाला नसून विरोधक धांदात खोट बोलून गैरसमज पसरवत आहेत. उलट आठ महिन्यापासून या प्रकल्पासाठी तत्कालिन सरकारने प्रयत्न केले नाहीत. प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे व फडणवीस सरकार यांच्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा आरोप चुकीचा असून चांगले झाल तर आमच्यामुळे झाले व जर काही चांगले झाले नाही तर शिंदे व फडणवीस यांच्यामुळे झाले हा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.
आठ महिन्यापासून संबंधित कंपनीला योग्य प्रतिसाद दिला नसल्यामुळेच हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बॉयलर इंडिया २०२२ च्या उद्घाटनप्रसंगी वाशी येथील कार्यक्रमाच्यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार निरंजन डावखरे, रमेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वेदातं समूह व त्यांचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मागील ८ महिन्यापासून प्रयत्न करत होते.त्यांना महाराष्ट्रात चांगल्या सोयीसुविधा व तर राज्यांपेक्षा सुट, तसेच ९९ वर्षाचा करार अशा गोष्टी हव्या होत्या.परंतू हे त्यांना देता आल नाही. तत्कालिन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याची या कंपन्याना भेटही मिळत नव्हती.त्यामुळे आता विनाकारण चुकीच्या व खालच्या प्रकारचे राजकारण केल जातय असे सामंत यांनी सांगीतले.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उद्योजकतेबाबत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबाबतचा पहिला कार्यक्रम असून राज्यात कोणताही उद्योग आणायचा असेल तर राज्यांकडून द्यावयाच्या सुविधा गुजरात,कर्नाटक, म्हणजेच इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आगामी काळात चांगले प्रकल्प आणण्यासाठी सरकार नक्की प्रयत्नशील राहणार असल्याचे सामंत यांनी सांगीतले.उलट आमचे सरकार येताच शिंदे व फ़डणवीस सरकारसमवेत कंपनीचे सादरीकरणही झाले होते. असे सांगीतले. एकंदरीतच विरोधकांनी सुरु केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान यांच्याशी फोनवर बोलणी झाली असून दोघांमध्ये वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा झाली असून नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
हेही वाचा : सिडकोच्या बोकडविरा परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच ; नागरिकांकडून संताप व्यक्त
राज्यात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी सरकार नेहमी कटीबद्ध राहणार असून बॉयलर हे कंपनीचे हॉर्ट आहे. कामगार व उद्योग या एका नाण्याच्या दोन बाजू असून आगामी काळात जास्तीत जास्त चांगले उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत अधिकाधिक सुविधा पुरवेल असे आश्वासनही सामंत यांनी दिले. तर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक खिडकी प्रकल्प राबवला जात असून उद्योगांमध्ये दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी बॉयलर सारख्या तंत्रज्ञानयुक्त प्रदर्शनाची आवश्यकता असून उद्योग व कामगार समांतर चालले तरच देशाची व राज्याची प्रगती अधिक वेगाने होते असे सांगीतले. यावेळी आपणही गोदरेच कंपनीत अनेक वर्ष वेल्डर म्हणून काम करत असल्याचे सांगून प्रत्येक उद्योगासाठी बॉयलर तसेच सुरक्षा अशा गोष्टी समजण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता असल्याचे मंत्री खाडे यांनी सांगीतले.
कोणताही उद्योग ४० दिवसात परत जात नसतो. त्यामुळे विरोधक हे खालच्या पध्दतीचे राजकारण करत असून आमच्या सरकारच्या ८ महिने अगोदरपासून या कंपन्या महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत होते.तेव्हा तुम्ही काय केले .त्यामुळे विरोधक धांदात खोट बेलत आहेत. – उदय सामंत ,उद्योगमंत्री ,महाराष्ट्र राज्य