नवी मुंबई : वेदांत व फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रा येणार प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्याबाबत विरोधकांकडून आरोप केला जात आहे. परंतू ह्या प्रकल्पाबाबत सरकारसोबत कोणाताही सामंजस्य करार झाला नसून विरोधक धांदात खोट बोलून गैरसमज पसरवत आहेत. उलट आठ महिन्यापासून या प्रकल्पासाठी तत्कालिन सरकारने प्रयत्न केले नाहीत. प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे व फडणवीस सरकार यांच्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा आरोप चुकीचा असून चांगले झाल तर आमच्यामुळे झाले व जर काही चांगले झाले नाही तर शिंदे व फडणवीस यांच्यामुळे झाले हा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.
आठ महिन्यापासून संबंधित कंपनीला योग्य प्रतिसाद दिला नसल्यामुळेच हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बॉयलर इंडिया २०२२ च्या उद्घाटनप्रसंगी वाशी येथील कार्यक्रमाच्यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार निरंजन डावखरे, रमेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वेदातं समूह व त्यांचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मागील ८ महिन्यापासून प्रयत्न करत होते.त्यांना महाराष्ट्रात चांगल्या सोयीसुविधा व तर राज्यांपेक्षा सुट, तसेच ९९ वर्षाचा करार अशा गोष्टी हव्या होत्या.परंतू हे त्यांना देता आल नाही. तत्कालिन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याची या कंपन्याना भेटही मिळत नव्हती.त्यामुळे आता विनाकारण चुकीच्या व खालच्या प्रकारचे राजकारण केल जातय असे सामंत यांनी सांगीतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा