विकास महाडिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिडकोने वाशी सेक्टर नऊ व दहामधील सुमारे ५०० लोकांना जुईनगर, सानपाडा येथील ‘संक्रमण शिबिरात’ स्थलांतरित केले. नवीन घरे मिळतील या आशेवर आलिया भोगाशी असे म्हणत तब्बल दोन तप संक्रमण शिबिरात काढली. आता ते त्यांच्या पुनर्बाधणी घराजवळील संक्रमण शिबिरात येऊन राहू शकणार आहेत. त्यांच्यासाठी हा काही अंशी दिलासा आहे.
वाशीत सिडकोने बांधलेल्या निकृष्ट दर्जाच्या इमारतीतील रहिवाशांना २०-२५ वर्षांपूर्वी जुईनगर, सानपाडा येथील संक्रमण शिबिरात सक्तीने पाठविले होते. मुळात ही संक्रमण शिबिरे नव्हती. सिडकोच्या विकल्या न गेलेल्या घरांमध्ये या रहिवाशांना कोंबण्यात आले होते. त्या रहिवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी त्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीच्या पुनर्बाधणी काळात बांधकामाजवळ राहण्याची मुभा दिली आहे. विकासक त्यांच्या राहण्याची सोय करणार आहेत. अशी ५०० तात्पुरती घरे तयार होणार आहेत. या रहिवाशांनी गेल्या ३० वर्षांत संक्रमण शिबिरात किती यातना सहन केल्या आहेत याची अनेकांना कल्पना नाही. त्यासाठी सिडको निर्मित निकृष्ट इमारतीच्या इतिहासात जाण्याची आवश्यकता आहे.
राज्य शासनाने १९७०च्या दशकात महामुंबई क्षेत्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित करून सिडकोला एक नवीन शहर वसविण्याची जबाबदारी दिली. सहा वर्षांनी सिडकोने वाशी सेक्टर एकमध्ये पहिली इमारत बांधून मुंबईत राहणाऱ्या गरीब गरजू घरहीन नागरिकांना नवी मुंबईत घेण्याचे आव्हान केले. त्याला प्रतिसाद देताना मुंबईत दाटीवाटीने राहणाऱ्या नोकरदारांनी ठाणे खाडीपल्याड भागात घर घेण्याची जोखीम स्वीकारली. जोखीम यासाठी की या भागात त्या वेळी दळणवळणाची, पायाभूत सुविधा, सेवा यांची साधने नव्हती. अशा दुर्लक्षित असुविधायुक्त नवीन शहरात मुंबईकरांनी अनेक संकटांचा सामना करीत घरे घेतली. ही घरे स्वस्त होती पण त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागत होती. मुंबईतील मराठीबहुल असलेल्या दादर, लालबाग, गिरगाव, या भागांतील नागरिकांनी नवी मुंबईत येणे पसंत केले. ८०च्या दशकात वाशी सेक्टर नऊ-दहामध्ये सिडकोने बांधलेल्या सुमारे एक हजार घरांमध्ये मुंबईतील चाकरमान्यांनी आपले बस्तान बसविले. सिडकोने बांधलेली ही घरे विकत घेतल्यानंतर चार-पाच वर्षांतच निकृष्ट बांधकामाचा उत्कृष्ट नमुना ठरली. मुंबईतील अनेक चळवळींत पुढे असलेल्या या सर्वसामान्यांनी सिडकोच्या या फसवणुकीविरोधात आवाज उठविला. सिडकोने बांधलेल्या जेएनवन जेएनटू प्रकारातील इमारती म्हणजे कोंबडय़ांची खुराडी असल्याचा अहवाल नंतर आयआयटी पवईने दिला. त्यामुळे सिडकोला या रहिवाशांची इतरत्र सोय करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. याच काळात नवी मुंबई पालिकेचे आगमन झाले. त्यांनी दरवर्षी धोकादायक अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यात वाशीतील या सिडको निर्मित इमारतींची संख्या जास्त ठरली आहे. नवी मुंबईत संक्रमण शिबीर नावाचा प्रकार नाही. उद्या या शहरात एखादी नैसर्गिक अथवा अनैसर्गिक दुघर्टना घडली तर तेथील अपघातग्रस्त रहिवाशांना शाळा, मैदाने, समाज मंदिरे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी हलविण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही.
या सार्वजनिक ठिकाणी नागरी सुविधा नसल्याने रहिवाशांना वास्तव करणे मुश्कील आहे, पण याचा कोणतेच प्राधिकरण गांभीर्याने विचार करीत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार त्या वेळी केला जातो. शहराचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोने एकही संक्रमण शिबिराची बांधणी केली नाही. त्यामुळे सिडकोने वाशी सेक्टर नऊ व दहामधील सुमारे ५०० लोकांना जुईनगर, सानपाडा येथील विक्री न झालेल्या घरात सक्तीने स्थलांतरित केले. त्या वेळी रहिवाशांनी पै पैसा करून कर्जावर विकत घेतलेल्या घरातून एका रात्रीत तथाकथित संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले. या निकृष्ट इमारती दुरुस्त अथवा त्यांची पुनर्बाधणी करून देण्याच्या बोलीवर हे स्थलांतर होते. वाशीसारखे मध्यवर्ती ठिकाण सोडावे लागल्याने मुलांच्या शाळांचा, नोकरीचा, सेवा सुविधांचा प्रश्न जुईनगरसारख्या अडगळीतील असलेल्या नोडमध्ये निर्माण झाला, पण नवीन घरे मिळतील या आशेवर त्या रहिवाशांनी गेली २० ते ३० वर्षे नरकयातना सोसून संसार रेटला.
संक्रमण शिबिराचे घर नावावर असण्याचा काही प्रश्न नव्हता. विकत घेतलेले ओसाड पडले होते. ताब्यात मालमत्ता नसल्याने कोणतीही बँका कर्ज देत नव्हती. मुलांची शिक्षण, आजारपणे, लग्ने यासाठी एक पैसा कर्ज मिळण्याची आशा मावळली. या रहिवाशांचा विकास खुंटला. सिडकोने दिलेल्या संक्रमण शिबिरातील घरांचीही नंतर दुरवस्था सुरू झाली. सिडको लक्ष देईना आणि पालिकेने जबाबदारी झटकली. संक्रमण शिबिरातील रहिवाशी एकत्र येऊन डागडुजी करू लागले, पण त्यांचे हात तोकडे पडले. त्यामुळे आलिया भोगाशी म्हणत या रहिवाशांनी तब्बल दोन तप या शिबिरामध्ये काढले. आता ते त्यांच्या पुनर्बाधणी घराजवळील संक्रमण शिबिरात येऊन राहू शकणार आहेत. त्यांच्यासाठी हा काही अंशी दिलासा आहे, पण संक्रमण शिबिराच्या नावाखाली त्यांची एक पिढी उद्ध्वस्त झालेली आहे. प्रत्येकाची वेगळी काहानी लिहावी अशा त्यांच्या कथा आहेत. मध्यंतरी त्यांच्या संक्रमण शिबिराला विरोध झाला, पण आयुक्तांनी यावर तोडगा काढून या रहिवाशांना स्वगृही राहण्याची परवानगी दिली यातच सर्व काही आले.