तिळगुळाशिवाय संक्रांतीच्या सणाची कल्पना करणे म्हणजे अवघड! तीळ आणि गुळापासून तयार केले जाणारे ते तिळाचे लाडू. मकरसंक्रांत या सणानिमित्त ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला ‘असे म्हणून गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश दिला जातो. यासाठी घरोघरी तिळगुळ लाडू हमखास बनवले जातात किंवा बाजरातून रेडिमेड आणून संक्रात साजरी केली जाते. परंतु यावर्षी तिळाच्या दारात प्रति किलो ४० रुपयांची वाढ झालेली आहे. मागील वर्षी १६० ते १७० रुपयांनी उपलब्ध असलेले तीळ यंदा २०० ते २१० रुपयांवर विक्री होत आहेत. गुळाचे दर स्थिर आहेत तर शेंगदाण्याच्या दारातही २५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच रेडिमेड तिळाचे लाडूचे ही २० ते २५ टक्के दर वाढले आहेत.

हेही वाचा >>>नवी मुंबई: लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. मकर संक्रांत सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी याकरिता तिळाचे लाडू खाल्ले जातात. मात्र सणात तोच तोचपणा येऊ नये याकरिता बाजारात तिळाचे वेग-वेगळे प्रकार उपलब्ध होत आहे. या सणामध्ये तिळाचे लाडू आणि रेवडी यांना जास्त पसंती दिली जाते. बाजारात तीळ बारीक करून गूळ किंवा साखरेपासून बनवलेली चिक्की उपलब्ध आहे. यामध्ये पिस्ता,गुलाब फ्लेवर ,गूळ, साखर अशा अनेक प्रकार आणि चवीची चिक्की उपलब्ध आहे. यंदा तिळाच्या दरात वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात तीळ गुजरात मधून दाखल होत असून मागील वर्षाच्या तुलनेत अवकाळी पावसाने उत्पादन घटले आहे. त्यामुळे ही दरवाढ झाली असल्याचे मत व्यापारी शैलेश जडेजा यांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी १६० ते १७० रुपये प्रति किलो दराने मिळणारे तीळ आता २०० ते २१०रुपये , गुळाचे दर स्थिर असून प्रतिकिलो ४८ रू, तर शेंगदाण्याचे दर ही वाढले असून आधी १०० ते १०५रुपयांनी उपलब्ध असलेले आता १२४ ते १४०रुपयांनी उपलब्ध आहेत. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसांची दर वाढल्याने रेडिमेट तिळगुळ लाडूच्या दारातही वाढ झाली आहे. मागील वर्षी १६० ते १८०रुपयांनी विक्री होणारे यंदा १८० ते २२० रुपयांनी विक्री होत आहेत .

हेही वाचा >>> Bornahan: लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

पदार्थांचा प्रकार प्रतिकिलो दर रुपयांत
आधी आता
तीळ १६०-१७० २००-२१०
गूळ ४८ ४८
शेंगदाणे १००-१०५ १२५-१४०

Story img Loader