मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून गावठी मोसंबी व संत्रा या फळांचा हंगाम सुरू होतो. बाजारात सध्या २५५९ क्विंटल संत्री तर १६००क्विंटल मोसंबी दाखल झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाने संत्रीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात आता नागपूरची गोड मोसंबी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहक मद्रासच्या आंबट मोसंबीपेक्षा गोड मोसंबीला जास्त पसंती देतात.
ऑक्टोबर महिन्यात फळधारणा झालेल्या संत्राच्या पिकाला पावसामुळे २०% ते २५% फटका बसला. एपीएमसीत मागील वर्षी यादरम्यान २५-३० गाड्या दाखल झाल्या होत्या ते आता २०-२५गाड्या दाखल होत आहेत. एपीएमसीमध्ये सर्व हंगामात मद्रासची मोसंबी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात थोड्या प्रमाणात नागपूर, अमरावती, जालनाची गोड मोसंबी दाखल होण्यास सुरुवात होते. मद्रासची मोसंबी ही आकाराने मोठी व चवीला आंबट असते. अशी मोसंबी जास्तीस्त जास्त रसाकरीता वापरली जाते. मात्र नागपूरची गोड मोसंबी नागरिक आवडीने खात असतात. परंतु ग्राहकांच्या मागणी नुसार बाजारात गोड मोसंबीची आवक कमी प्रमाणातच होत असते. बाजारात नागूपरची मोसंबी दाखल होताच त्या मालाचा उठाव लगेच होतो. अमरावती आणि विदर्भातून येणारे संत्र आकाराने मोठे व अधिक गोड असते. घाऊक बाजारात संत्रीच्या ८ डझनला पेटी ९००रु ते १२००रु दर आहे.