येथील मोरा- भवरा परिसरातील बुधवारी स्थानिक मच्छिमाराना मासेमारी करीत असतांना एक फ्लेमिंगो आढळला आहे. तो जखमी असल्याने त्याला उरणच्या वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा फ्लेमिंगो करड्या रंगाचा लेसर फ्लेमिंगो आहे. मुंबई व उरणच्या पाणथळी वर हजारोंच्या संख्येने दरवर्षी फ्लेमिंगो येतात. या फ्लेमिंगो ची शिकाऱ्याकडून हत्या करण्याच्या तसेच उच्च दाबाच्या विद्युत वहिनीला धडक लागल्याने मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी उरण मध्ये घडल्या आहेत. नुकताच संक्रातीच्या सणानिमित्त पतंगबाजी पार पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर आरटीओची करडी नजर ; १५ रॅपिडोवर कारवाई

या पतंगाच्या मांज्यामुळे ही पक्षी जखमी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या फ्लेमिंगोला ही जखम झाली असल्याची शक्यता आहे. मोरा समुद्र किनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या तरुण मच्छिमारांना किनाऱ्यावरून चालत असलेला फ्लेमिंगो दिसला. त्याच्या जवळ मच्छिमार गेले असता. त्याला उडता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या मच्छिमारांनी रघुनाथ नागवेकर या निसर्ग मित्राशी संपर्क साधला साधून त्याची माहिती दिली. या फ्लेमिंगो च्या दोन्ही पंखाना जखम झाल्याने त्याला उडता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उरणच्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यांनतर वन विभागाने जखमी फ्लेमिंगो ताब्यात घेऊन उपचारासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे नेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injured flamingo rescued by fisherman at mora bhavra area near uran zws
Show comments