लोकसत्ता टीम

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार, मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट धोकादायक घोषित केले असून इतर मार्केट ३० वर्षापेक्षा जुने झाले असल्याने इमारतींचे संरचना परीक्षण करा अशी नोटीस नवी मुंबई महापालिकेने एपीएमसीला बजावली आहे.

Mumbai Municipal Corporation approved three and a half thousand applications under Water for All Policy Mumbai
मुंबई: ‘सर्वांसाठी पाणी धोरणा’अंतर्गत साडेतीन हजार अर्ज मंजूर
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Job Opportunity Opportunities in BPCL career
नोकरीची संधी: ‘बीपीसीएल’मधील संधी
Yamaha RayZR Street Rally with updated features launched in India
स्वस्त किंमत आणि मस्त फीचर्ससह यामाहा रे ZR स्ट्रीट रॅली स्कूटर लाँच; किंमत ९८ हजार रुपयांपासून सुरू
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
IIT Bombay
IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार
eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
cyber fraud of 88 lakh with company manager
मुंबई : कंपनी व्यवस्थापकाची ८८ लाखांची सायबर फसवणूक

सन १९८२ साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तुर्भे येथील सिडकोच्या १७५ एकर जागेत वसवण्यात आली आणि अल्पावधितच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण झाली, मात्र या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी छताचा भाग कोसळतो तर माल धक्के तुटले, धक्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना घडतात. इमारतीला खांबाना तडे जाण्यास सुरुवात झाली. नवी मुंबई महापालिकेने सर्व प्रथम २००५ साली येथील कांदा बटाटा बाजारातील इमारती धोकादायक घोषित केल्या,तर मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट इमारत देखील धोकादायक घोषित करण्यात आले आहे. येथील गाळे धारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने यंदा देखील या व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच व्यवसाय करावा लागणार आहे. या इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्याच नवी मुंबई महानगर पालिका जबाबदार राहणार नाही अशा सूचना नवी मुंबई महानगर पालिकेने दिल्या आहेत. मागील अनेक वर्षापासून या इमारती आहेत धोकादायक घोषित करून देखील बाजार समितीने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने येथील व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागत आहे.

आणखी वाचा-द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी

मागील वर्षी घडल्या दोन दुर्घटना

नवी मुंबई महानगर पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या बाजार समितीतील कांदा बटाटा बाजारातील एफ गल्लीत मागील वर्षी १७ जुलै २०२३ रोजी गाळ्याचा सज्जा कोसळला होता. मात्र ही घटना रात्री आठ वाजता घडली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणती जीवित हानी झाली नाही. त्यानंतर पालिकेने सदर बाजार रिकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्यायी जागा नसल्याने गाळे खाली करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. तसेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी धान्य बाजारातील वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

आणखी वाचा-पनवेलकरांनो आरोग्याची काळजी घ्या- महापालिका आयुक्त चितळे  

शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे तज्ञ वास्तू विशारद कडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करून त्याचा अहवाल नवी मुंबई महानगर पालिकेकडे सादर करावा. तसेच अहवालात दुरुस्ती अथवा पाडकाम बाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी बाजार समितीला वारंवार पत्र देऊन देखील बाजार समितीने येथील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल दिलेले नाहीत. -भरत धांडे, तुर्भे विभाग अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

कांदा बटाटा आणि मसाला मार्केटमधील मध्यवर्ती इमारत धोकादायक असल्याबाबत नोटीस आली आहे. तसेच बाजार समितीमधील तीस वर्षे जुन्या इमारतींचे संरचना परीक्षण करण्याचे नोटीस असून या इमारतींचे संरचना परीक्षण करण्यात येईल. -डॉ. पी एल खंडागळे, सचिव, एपीएमसी