उमेदवारांची निवडणुकीपूर्वी लगीनघाई; प्रतिमासंवर्धनासाठी सढळहस्ते खर्च

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली आणि ती अपेक्षेपेक्षा लांबणीवर पडली असली, तरी हा वेळ सार्थकी लावण्यात इच्छुक उमेदवार मग्न झाले आहेत. मिळालेला जादा वेळ त्यांनी प्रतिमासंवर्धनात गुंतवला आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाहणाऱ्यावर पडावी म्हणून हवे तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी दाखवत आहेत.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

पनवेल महापालिकेत ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. पालिकेच्या पहिल्या सभागृहात स्थान मिळावे म्हणून इच्छुक उमेदवारांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. मतदार याद्यांवर अनेक हरकती आल्यामुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे. परिणामी प्रचार थंडावला आहे. परंतु इच्छुक उमेदवारांनी या काळात स्वत:चे व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर भर दिला आहे. नेता म्हणजे पांढरा शुभ्र झब्बा हे समीकरण आता बदलले असले तरीही पांढऱ्या रंगाचा करिश्मा आजही बाकी आहे. आपल्या रूपाला साजेसे आणि समोरच्यावर क्षणात छाप पाडतील असे कपडे खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे. पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त अन्य रंगांचे कुडते घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कॉटनच्या कपडय़ांना सर्वाधिक मागणी आहे. कपडय़ांच्या शिलाईसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च केले जात आहेत.

पनवेल पालिकेतील अनेक प्रभाग हे ग्रामीण व शहरी भाग असे जोडलेले आहेत. उमेदवारांना सात ते दहा किमी अंतर रोज फिरावे लागणार आहे. घरोघरी मतांचा जोगवा मागण्यासाठी बरीच पायपीट करावी लागणार आहे. उन्हाळ्यात दिवसातून तीन जोड कपडे बदलावे लागतील, हे लक्षात घेऊनच खरेदी केली जात आहे.

फलकबाजी आणि समाजमाध्यमांवर झळकवण्यासाठी खास छायाचित्रे काढून घेतली जात आहे. ज्याच्याकडून छायाचित्र काढून घ्यायचे त्याचा स्टुडिओ वातानुकूलित असावा, असा निकष लावण्यात येत आहे. आत्मविश्वास झळकावा म्हणून छायाचित्रकार आपले कौशल्य पणाला लावत आहेत. वातानुकूलित स्टुडीओत चार तासात ३०० छायाचित्रे टिपणाऱ्यांचे दर ४० हजारांपर्यंत आहेत. छायाचित्रकारही एका प्रतीचे २५० ते ३०० रुपये असे दर लावत आहेत. उमेदवारांचे हेच अप्रतिम फोटो मतदारांच्या मोबाइल फोनवर पाडव्यापासून ते महिलादिनापर्यंतच्या शुभेच्छांसह झळकत आहेत. उमेदवारांच्या या लगीनघाईतील ‘होऊ द्या खर्च’ या तयारीमुळे सलोनचालक, कापड व्यापारी, शिंपी व छायाचित्रकार यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत.

चेहरा उजळवण्यासाठी तीन हजार

चेहरा स्वच्छ आणि उजळ दिसावा म्हणून विविध उपचार घेतले जात आहेत. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी, मसाज व फेशियल करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक जण आठवडय़ाला तीन हजारांपर्यंत खर्च करत आहेत.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]