नवी मुंबई : नवी मुंबई शहराची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण व्हावी, यासाठी चालू वर्षांपासूनच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय फ्लेमिंगो फेस्टीव्हल आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता शहरभान’ या कार्यक्रमात केली. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या ‘शहरभान’ उपक्रमात महापालिका आयुक्तांनी शहरात आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाशी येथील मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नवी मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते. नवी मुंबई शहरातील प्रशासकीय यंत्रणांच्या कारभाराची प्रक्रिया समजून घेण्यासाठी जमलेल्या उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तत्पूर्वी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले तर, जयेश सामंत यांनी विविध विषयांवर महापालिका आयुक्तांना बोलते केले.
पायाभूत सुविधांच्या आगाडीवर देशभरात नावलौकीक असलेले नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात अव्वल आहेच; त्यासोबतच या शहराला देशात पहिला क्रमांक मिळवून देण्याचा निर्धार नार्वेकर यांनी व्यक्त केला. ‘शहरभान’ सारख्या उपक्रमांतून पालिकेला नागरिकांचा असाच सहभाग आणि पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले. ‘नवी मुंबईचे वयोमान आज चाळीस ते पंचेचाळीसच्या घरात आहे. या वयातच हे शहर पुनर्विकासाचे नवे प्रारूप अंगिकारत आहे. हा बदल घडत असताना शहरातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या संकल्पनांचा नव्याने विचार करावा लागेल. त्यासाठी ठोस धोरणे आखावी लागतील. यासाठी २०५०पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल इतक्या पाण्याचे नियोजन आम्ही करत आहोत,’अशी भूमिका नार्वेकर यांनी यावेळी मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरातील नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्यात येतात. नियमित मुबलक पाणी, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य-शिक्षण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या अनेक सुविधा पुरवण्यात येतात. त्या पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासन कसे नियोजन करते, याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले.
पार्किंगवर लवकरच तोडगा
नवी मुंबईला सर्वाधिक भेडसावणाऱ्या पार्किंगच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आगामी काळात सिडको, एमआयडीसी यांच्याकडून भूखंडाचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. तसेच पुनर्विकास प्रकल्पांच्या नव्या उभ्या राहणाऱ्या इमारतीमधून पार्किंगची धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घेतली जात आहे, असे नार्वेकर म्हणाले. मुंबई महानगर प्रदेशात खड्डेविरहीत शहर हा नावलौकीक आम्हाला मिळाला तसेच यापुढेही उत्तम रस्ते राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
सांस्कृतिक एकजिनसीपणा
मुंबई, ठाणे या शहरांप्रमाणे नवी मुंबईला सांस्कृतिक चेहरा नाही, असे आपल्याला म्हणता येणार नाही. शहरात मोठय़ा संख्येने वाचनालये, सांस्कृतिक उपक्रम, समाजमंदिरे, विरंगुळा केंद्रे, ज्येष्ठ नागरिक भवन या माध्यमातून शहरात सांस्कृतिक एकजिनसीपणा आलेला आहे, असे मतही पालिका आयुक्तांनी व्यक्त केले.