नवी मुंबई : नवी मुंबई मनपा पेपरलेस कामकाजावर भर देत असते. त्यामुळे सर्वच विभाग कार्यालयात इंटरनेट सेवा आहे. खासकरून नवी मुंबईकरांशी संबंधित जसे विविध देयके जमा करणे, इ सेवाद्वारे आलेल्या तक्रारी पाहणे पाठपुरावा करणे, आदी. त्याचबरोबर दैनंदिन नोंदीची अन्यत्र मनपा कार्यालय मुख्यालय यांच्यातील देवघेवसाठी इंटरनेट सेवा अत्यंत महत्वाची बजावते. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात सोमवारी इंटरनेट सेवा बंद होती.
इतरत्र पाहणी केली असता सर्वच म्हणजे आठही विभाग कार्यालयांत इंटरनेट सेवा ठप्प असल्याचे समोर आले. इंटरनेट शुल्क दिले नसल्याने ही सेवा बंद करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने कामकाज बंद होते. चौथ्या दिवशी इंटरनेटमुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. सुट्ट्या असल्याने सेवा कधी बंद झाली हे सांगता येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा – पनवेल पालिकेविरोधात प्रकल्पग्रस्तांचे मंगळवारपासून धरणे आंदोलन
याबाबत विद्युत विभाग मुख्य अधिकारी प्रवीण गाढे यांना विचारणा केली असता इंटरनेट सेवा ठप्प झाल्याच्या प्रकाराला त्यांनी दुजोरा दिला व त्याचे कारण शोधून लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे सांगितले.