सुखकर भविष्यासाठी तारुण्यात गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र असे करताना आपण नेमकी कुठे गुंतवणूक करीत आहात याची खातरजमा जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा जास्त फायद्याच्या लालसेपोटी आहे तेही गमावून बसण्याची वेळ येते. असाच एक प्रकार नवी मुंबईतील एका तरुणीसोबत घडला आहे. तरुणीची तब्बल ११ लाख १४ हजार ६५० रुपयांची फसवणूक झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिया देसाई असे या तरुणीचे नाव असून त्या घणसोली येथे राहतात. स्वतः नोकरी करीत असून भविष्यासाठी गुतंवणूक करायची म्हणून त्यांनी टेलिग्राम हे अँप मोबाईल मध्ये डाऊनलोड केले होते. त्या द्वारे त्यांना बिन्स (Binance app)अँप जॉईन करण्याचे  सारखे मेसेज येत होते. १४ मे २०२२ मध्ये  तरुणीने अँप जॉईन केले. त्या गृपच्या अँडमीनने त्यांना ५० हजार डॉलर मध्ये गुंतवणूक करा ३ दिवसात १०० टक्के परतावा मिळेल असे सांगितले त्यामुळे तरुणीने पैसे भरले. चार दिवसांनी तिला १५ टक्के अतिरिक्त बोनस मिळाल्याचा मेसेज आला.

हेही वाचा: चिरनेरमधील मातीच्या भांडय़ांना वाढती मागणी; महिलांचा व्यवसाय तेजीत

मात्र पैसे मिळाले नाहीत म्हणून चौकशी केली असता ब्लॉक एरर असे कारण देण्यात आले. मात्र हे पैसे मिळण्यास व एकूण रक्कम मिळण्यासाठी विविध कारणे सांगून थोडे थोडे करीत १७ मे ते २८ मे दरम्यान ११ लाख १४ हजार ६५० रुपये ऑनलाईन स्वरूपात तरूणीकडून घेण्यात आले. मात्र नंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा करून मंगळवारी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investing online has become expensive eleven lakh fraud of a young woman in navi mumbai tmb 01