उरण : जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरील समुद्री विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या वाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी पाऊस व समुद्राच्या भरती ओहटी मुळे अडथळा येत असल्याने येथील तीन गावातील नागरीकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> उरण चिटफंड घोटाळा प्रकरणी पोलिसांकडून जमावबंदी आदेश

घारापुरी बेटावर वीज पुरवठ्यासाठी २०० केव्हीए रोहीत्राद्वारे समुद्राखालून टाकण्यात आलेल्या आहेत. त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केल्याने महावितरणकडून वीज वाहिन्या दुरुस्तीच्या कामाच्या वेळेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.त्यामुळे बेटवासियांना यापुढील काही महिने तरी वीजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: चिकन दुकानासमोर रांगा, श्रावण आला…

महावितरणाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच बेटवासियांवर मागील महिन्यापासून वीजेच्या संकटांचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली असुन त्याचप्रमाणे बेटावरील उघड्या वाहिन्या आणि नादुरुस्त डीपीमुळे नागरिक, जनावरांना वीजेचा धक्का लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. घारापुरी बेटावर वीजेची समस्या निर्माण झाल्याने रहिवाशांवर वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.थ्री-फेज सप्लाय नसल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीला सध्या जनरेटरचा वापर करावा लागत आहे.यामुळे ग्रामपंचायतीला अतिरिक्त खर्चाचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली. दुसऱ्या ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती पनवेल महावितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस.ए.सरोदे यांनी दिली.