उरण : शुक्रवारी अकरा साडेअकरा वाजताच्या सुमारास उरणच्या पिरवाडी परिसरातील समुद्रात दोन पर्यटक अडकल्याचे वृत्त आले. याची माहिती मिळताच नागाव – पिरवाडीमधील सागरी रक्षा दलाच्या तरुणांनी मिळेल त्या साधनाने त्यांना वाचविण्याची तयारी केली. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दोन जीवरक्षकांनी खडकात जात शहानिशा केली तर माणसं नव्हती तर ती कुत्री असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र येथील स्वयंसेवी सागरी जीव रक्षकांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षा साधने आणि उपकरणे उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे पुन्हा एकदा उरणच्या सागरी सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी दुपारी अकरा साडेअकरा वाजता उरणच्या पिरवाडी समुद्रातील खडकात भरतीचे पाणी वाढल्याने खडकात कोणीतरी अडकलेले दिसत होते. यात दोन माणसं असावीत असा संशय आणि अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार स्थानिक सागरी रक्षकांनी उरण पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे पोलीस सज्ज झाले. अग्निशमन दलालही प्रचारण करण्यात आले. त्याचवेळी स्थानिकांच्या मदतीने सागरी सुरक्षारक्षकांनी त्याच्याच बोटीने खडकाजवळ जात शहानिशा केली. त्यावेळी खडकात माणसं नसून दोन कुत्री अडकली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा – कळंबोली मार्बल मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा फरशी पडून मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

सागरी सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उरणला पिरवाडी व केगाव – दांडा हे दोन समुद्र किनारे आहेत. या दोन्हीपैकी पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्यने पर्यटक येत असतात. येथील पिरवाडी दर्ग्याच्या पुढे ओहोटीच्या वेळी समुद्रातील खडकापर्यंत पर्यटक जात असतात. तसेच किनाऱ्यावर अनेक पर्यटक समुद्रात पोहतात. समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याचा वेग पाहता पर्यटक वाहून जाण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सागरी सुरक्षा दल आहे. त्यासाठी येथील स्थानिक तरुण स्वयंसेवी भावनेतून जिवावर उदार होऊन पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्याजवळ आवश्यक ती सुरक्षा उपकरणेच नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was reported that two tourists got stuck in the sea in pirwadi area of uran but it turned out that they were not tourists but dogs ssb
Show comments