नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात वर्षभर कच्च्या फणसाची आवक होत असते. विशेषतः वटपौर्णिमा निमित्ताने या फळाला अधिक मागणी असते. त्यामुळे वाशीतील घाऊक बाजारात दोन दिवसांपासून पिकलेल्या फणसाचा सुगंध दरवळत आहे. तेव्हा गेले दोन दिवस फणस विक्रीची उलाढाल एपीएमसीत सध्या जोरात सुरु आहे.
कच्चा फणसाची भाजी आणि विविध पदार्थ बनविले जात असल्याने कच्च्या फणसाला चांगली मागणी असते. एपीएमसीत फणसाची आवक ही राज्याबाहेरुनही मोठ्या प्रमाणात होत आहे,विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडू येथून मोठ्या प्रमाणात फणसाची आवक सुरू झाली आहे. तामिळनाडू येथून दाखल होणारे फणस हे आकाराने मोठे व चवीला गोड असल्याने याचे बाजारभाव जास्त आहेत. गुरुवारी बाजारात फणसाच्या एकुण ५० ते ६० गाड्या दाखल झाल्या असून प्रति किलोला १० ते २५ रुपये बाजारभाव सध्या आहे.