नवी मुंबई : आधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी ही देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपानच्या ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. तसेच तुर्भे येथील ई व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. पर्यावरणाच्या अनुषंगाने अत्याधुनिक कार्यप्रणाली व प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने जपानमधील ओसाका सिटी गव्हर्मेंट आणि महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून पर्यावरण, किनारपट्टी व बंदर विकास तसेच स्मार्ट सिटी विषयाच्या अनुषंगाने ओसाका सिटी गव्हर्मेंटचे अभ्यासगट विविध भागांना भेटी देत पाहणी करत आहेत व माहिती जाणून घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्यावतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे ई व्हेईकल चार्जींग स्टेशन तसेच तळोजा एमआयडीसीतील फिश प्रोसेसिंग व फुड प्रोसेसिंग युनिटला भेट देण्याच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहर अभियंता संजय देसाई यांनी ओसाका सिटी गव्हर्मेंट जपानचे अधिकारी ओकामोटो कटाओका, ग्लोबल एन्व्हायरोमेंट सेंटर जपानच्या अधिकारी अकीको डोई, नावो नाकाजिमा आणि ओसाका सिटी जपानचे भारत देशातील प्रतिनिधी अंशुमन नेल बासू, दुभाषक डिंम्पल यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.

हेही वाचा : “येत्या शंभर दिवसात एपीएमसी पुनर्विकास कृती आराखडा तयार करू”, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन

या परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतिश पडवळ आणि सह प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, सचिन आरकड, विक्रांत भालेराव उपस्थित होते. नवी मुंबई शहरातील स्वच्छता आणि सुशोभिकरणाने प्रभावित झाले असल्याचे अभिप्राय जपानमधील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan osaka city government officials visited environmental projects in navi mumbai css
Show comments