उरण: तालुक्यातील जासई, चिरनेर व दिघोडे या तीन ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान सुरू आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार मते असल्याने त्याचप्रमाणे ही निवडणूक नातीगोती- शेजारी यावर होते. त्यामुळे इतर निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणूकीला मतदार प्रचंड प्रतिसाद देतात.
मागील पंधरा दिवसांत या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला होता. निवडणूक ही पक्षीय राजकारणाशी निगडीत असली तरी ग्रामपंचायत निवडणूक ही उमेदवारांच्या वैयक्तिक संबंधावर ही मते मिळतात. उरणच्या तिन्ही ग्रामपंचायती या आर्थिक सबळ आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लक्ष्मी दर्शनाची ही चर्चा आहे.
हेही वाचा… उरण- खारकोपर लोकलचा दिवाळी मुहूर्त ही हुकणार? उरणचे प्रवासी पाहताहेत उदघाटनाची वाट
१० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता: या निवडणुकीत मतदार राजाला लक्ष्मी दर्शनाच्या निमित्ताने जवळपास १० कोटी पेक्षा अधिकची उलाढाल होणार असल्याची चर्चा आहे.