उरण : जासई येथील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने अखेर शुक्रवारपासून जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेलकडे जाणारी पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याची माहिती एनएचआयने दिली आहे.
गणेशोत्सवापूर्वी उरण – पनवेल महामार्गावरील जासई उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन मार्गिका सुरू न झाल्याने प्रवासी व वाहतूकदार संभ्रमात होते. अखेर गुरुवारी पुलावरील वजन क्षमता चाचणी पूर्ण झाल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून जासई उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
जासई पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या पुलावरील जेएनपीटी ते नवी मुंबईला जोडणारी मार्गिका सुरू करण्यात आली असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) संचालक यशवंत घोटीकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांच्या परवानगीनंतर एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
पूल सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार असून उरणमधील प्रवाशांना फायदा होईल, असे मत उरणमधील नागरिक महेश घरत यांनी व्यक्त केले. मागील नऊ वर्षांपासून रखडलेल्या उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गावरील जासई उड्डाणपुलाचे काम रखडले होते.