एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत राहणारे ८५ वर्षीय विमलभुषन नंदकिशोर भटनागर यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिणे चोरी झाले होते. ही घटना घडल्या नंतर त्यांचा नौकर बेपत्ता झाल्याने संशयित म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यातील अटक आरोपीचे नाव जोगीकुमार कुवर मुखीया असून तो फिर्यादी कडे काम करीत होता. गेल्या आठवड्यात तो न सांगता काम सोडून निघून गेला होता. २९ डिसेंबरला घरातील १७,लाख ०४ हजार ४००रुपयेच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे भटनागर यांच्या लक्षात आले. त्यातच घरगड्याने काम सोडल्याने त्याच्यावरच संशय व्यक्त करीत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.गुन्हा गंभिर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी चोरट्याच्या शोध घेण्यास दोन पथके निर्माण केले होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : नववर्षानिमित्त रस्त्यावरच विक्रीसाठीची नवी वाहने वाहतूक विभागाने हटवली
आरोपी इसमाचा शोध तात्काळ सुरू केला.गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता परंतु फिर्यादी यांच्याकडे आरोपी कोठे राहत आहे याबाबत काही एक कागदपत्र त्याच्याकडे उपलब्ध नव्हता, तसेच आरोपी यांनी त्याचा मोबाईल हि बंद ठेवलेला होता. आरोपी यांचे तपास करीत असतांना त्याचे मोबाईल बंद होण्याचे शेवटचे लोकेश हे कोपरीगाव विरार येथे आले होते. मात्र मोबाईल बंद असल्याने तपास खुंटला होता. त्यामुळे पोलिसांनी समाज माध्यमाची मदत घेत त्याचा फोटो मिळवला. व गोपनिय बातमीदाराला दाखवुन आरोपीच्या ठाव ठिकाण्याबाबत शोध सुरू केला.
हेही वाचा >>> नवी मुंबई : युवतीची तक्रार न घेणारा ‘तो’ पोलीस अधिकारीही निलंबित
अविरत पणे २४ तास शोध घेतल्याची मेहनत कामी आली व आरोपी हा विरार येथे असल्याची खात्री झाली. तात्काळ सदर ठिकाणी पथक रवाना झाले. आरोपीचा विरार परिसरात शोध घेत असताना आरोपी हा रुद्रांश अपार्टमेंट जवळ, कोपर तलावाजवळ, कोपरगाव, विरार या ठिकाणावरून जात असतांना आढळून आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या सोन्याचे व चांदिचे दागिन पैकी एकुण ८ लाख १४ हजार ८६८ रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील चोरी केलेल्या दागिन्याचे सोनाराकडुन व्हॅल्युशन केले असता. फिर्यादी यांनी सांगितलेल्या दागिन्या पैकी काही दागिने हे खोट असल्याचे हि निष्पण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे . अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी दिली.