उरण : देशातील सर्वात मोठ्या बंदरांमध्ये गणल्या जाणाऱ्या उरण येथील जवाहरलाल नेहरु बंदराच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलताना केंद्र सरकार आणि जेएनपीटी व्यवस्थापनाने मंगळवारी महत्त्वाचे करार केले. बंदरात येणाऱ्या कंटेनर हाताळणीसाठी उत्तम गोदाम सुविधा याशिवाय वाहतुकीसाठी इतर सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी काही महत्त्वाचे करार यावेळी करण्यात आले. त्याशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी बंदर परिसरातच सीबीएसई शाळेच्या इमारतीच्या विकासाचे भूमिपूजनही करण्यात आले. या सर्व सुविधा विकसित करत असताना, हे बंदर पर्यावरण अनुकूल राहील यासंबंधीचा पावले उचलली जात असल्याचा दावा जेएनपीएचे अध्यक्ष उमेश वाघ यांनी केला. बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत वाहने, सौर ऊर्जा, पक्ष्यांसाठी तलावांचे सुशोभिकरण, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा