उरण : २६ मे १९८९ ला सुरू झालेल्या न्हावा-शेवा आणि सध्याच्या जेएनपीए ने ३४ व्या वर्षात पदार्पण केले असून, येत्या दोन महिन्यांत देशातील पहिले स्मार्ट बंदर होणार आहे. त्याचप्रमाणे हरित बंदराकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती केंद्रीय बंदर, जलवाहतूक मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने जेएनपीएला जगातील अव्वल परफॉर्मर म्हणून स्थान दिले आहे. तर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कार्यक्षमता यामुळे जेएनपीए बंदर ३४ वर्षांपासून ग्राहकांच्या समाधानासाठी अतूट वचनबद्धतेसह जेएनपीए सागरी उद्योगात उत्कृष्टतेचे प्रतिक म्हणून उदयास आले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : भुरट्या चोरट्यांनी सीवूड्सकर हैराण

जेएनपीए भारतातील एकमेव असे बंदर आहे जिथे जगातील प्रमुख तीन कंटेनर टर्मिनल ऑपरेटर – पीएसए इंटरनॅशनल, डीपी वर्ल्ड आणि एपीएम टर्मिनल्स या बंदरावर सुविधा चालवतात. जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) अहवाल, २०२३ हा बंदराच्या उत्कृष्ट कामगिरीच्या अव्वलस्थानी आला आहे. मार्च २०२३ मध्ये बंदरातून ६० लक्ष कंटेनर हाताळणीचा विक्रम केला आहे.

जेएनपीएचा जागतिक दर्जाचे बंदर म्हणून सुरू असलेला प्रवास हा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावत आहे. जागतिक पुरवठा साखळीत कंटेनरायझेशनचा समावेश झाल्याने स्टीलच्या कंटेनरमध्ये माल नेण्यात या बंदराची मोलाची भूमिका असल्याचे मत केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – वंडर्स पार्कमधील दिव्यांच्या तपासणीसाठी अभियंत्यांची बॅंकॉक वारी; वंडर्स पार्कमधील विद्युत कामे पूर्ण झाल्यावर कसली तपासणी ?

भारत सरकार, ग्राहक, कर्मचारी आणि स्थानिक समुदायासह आमच्या भागधारकांचा पाठिंबा, तसेच सतत नावीन्य, विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध राहू, असे मत जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केले. यावेळी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ व बंदराचे इतर अधिकारीही उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpa to become country first smart port ssb