उरण : जेएनपीटीला जोडणाऱ्या न्हावा शेवा उड्डाणपूलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पुलावरील खड्ड्यांतील खडीमुळे मातीचा धुरळा झाला आहे. याचा त्रास या मार्गाने जेएनपीटी बंदरात ये जा करणाऱ्या कामगार ,कर्मचारी व बंदरावरील उद्योगात काम करणाऱ्या तसेच उड्डाणपूलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेएनपीटी बंदरात बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर सिंगापूर ( बी.एम. सी. टी.) बंदर उभारण्यात आले आहे. चौथे बंदर म्हणून ही बंदराची ओळख आहे. या बंदराला जोडण्यासाठी न्हावा शेवा पोलीस ठाण्या जवळ उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. त्यातच पावसमुळें या खड्ड्यात वाढ झाली आहे. पुलावरून दररोज हजारो जड कंटनेर वाहने प्रवास करीत आहेत. त्यांच्या वजन व दाबामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी टाकण्यात आलेल्या खडीचे रूपांतर धुळीत होत आहे. पुलावरील सततच्या वाहतुकीमुळे येथील प्रवाशांना प्रचंड धुरळायुक्त मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा : पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला

पुलाच्या वारंवार दुरुस्ती नंतर ही पूल नादुरुस्तच

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या या उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम वारंवार करूनही पुलाची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे येथील वाहनचालक व प्रवाशां कडून संताप व्यक्त केला जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpt port nhava sheva flyover bad condition potholes problem peoples uran navi mumbai tmb 01