जेएनपीटी बंदर ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) ही जलसेवा १ ते ४ डिसेंबर दरम्यान गेटवे ऐवजी भाऊचा धक्का येथे लागणार आहे. व भाऊचा धक्का ते जेएनपीटी असा प्रवास करणार आहे. गेट वे परिसरात चार दिवस नौदल डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे जेएनपीटी वरून गेट वे ऑफ इंडिया येथे जाणारी प्रवासी बोट चार दिवस भाऊच्या धक्यावर जाईल व तेथूनच जेएनपीटीला येईल. अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.
हेही वाचा- नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…
जेएनपीटी ते मुंबई ही जलसेवा आहे. ती पावसाळ्यात जून ते सप्टेंबर चार महिने भाऊचा धक्का तर सप्टेंबर ते मे या महिन्यात जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू असते. या बोटीतून जेएनपीटी बंदरातील कामगार,कुटुंबीय तसेच इतर नागरिक ही दररोज प्रवास करतात. उरण जेएनपीटी ते दक्षिण मुंबई या एक तासांचा प्रवास आहे. मात्र जेएनपीटी व्यतिरिक्त नागरिकांना हा प्रवास महागाचा पडतो. तर जेएनपीटी कामगारासाठी मोफत आणि त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात हा प्रवास करता येतो. या जलमार्गावर जेएनपीटी मधील खाजगी बंदरातील कामगार ही प्रवास करतात. या सेवेसाठी जेएनपीटी कामगार वसाहत ते जेएनपीटी धक्का अशी स्वतंत्र बस सेवा ही आहे. त्याचप्रमाणे विना अडथळा मुंबईत प्रवास करता येत असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.