उरण : जेएनपीटी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मंगळवारी प्रवेशद्वार बंद आंदोलन केले. बंदराच्या कामगार वसाहतीत असलेल्या विद्यालयातील शिक्षिका समाजमाध्यमातून(इंस्टाग्रामवर) मद्य प्रचार,प्रेम आदींचा पुरस्कार करीत असल्याचा पालक-शिक्षक यांचा आक्षेप असून विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी,शिक्षकांना नियमित वेतन द्या तसेच नादुरुस्त इमारत व अपुरी व्यवस्था असल्याने पर्यायी व्यवस्था करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविणार असल्याचे मत आर के एफ शिक्षण संस्थेचे मुख्य प्रशासक रवींद्र इंदुलकर यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचप्रमाणे विद्यालयात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील,शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न जेएनपीटी प्रशासनाने सोडवायचा आहे. तसेच ज्यांच्यावर पालक-शिक्षकांचा आक्षेप आहे त्या विद्यालयात प्रशासक आहेत. त्यांच्यावर जेएनपीटी कारवाई करील अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर,जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील, एल. बी.पाटील,शिक्षक नेते नरसु पाटील आदीजण आंदोलनात सहभागी झाले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpt vidyalaya students parents and teachers closed the entrance protest uran amy