नागपूरचे संचालक सुधीर कोठारी यांनी पणन विगाभाच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. याला न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच ६ जून पर्यंत स्थगिती दिली होती . परंतु ६ जूनला होणारी सुनावणी आणखी ३ आठवडे पुढे ढकलण्यात आली असून महिन्याभराने याचा निर्णय लागण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याने एपीएमसीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमु नये ? याबाबत उर्वरित ८ संचालकांना पणन विभागाने करणे दाखवा नोटीस बजावली होती. ११मे ला सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र संचालक मंडळ बरखास्त करण्याला सदस्यांनी विरोध केला असून, नागपूर येथील संचालक सुधीर कोठारी यांनी पणन विभागाच्या या निर्णय प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला न्यायालयाने ६ जुनची सूनवणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र ६ जूनला होणारी सूनवणी ३ आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाचा निर्णय आणखीन लांबला आहे. एपीएमसीतील अत्यावश्यक सेवा अंतर्गत नालेसफाईला पणन विभागाने हिरवा कंदील दिला असला तरी, उर्वरित धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाच्या अभावी ठप्प आहेत. त्यामुळे संचालक मंडळाचा निर्णय लवकरात लवकर लागणे एपीएमसीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.